उंब्रजजवळ महामार्गावरील वाहतूक रोखली, कोल्हापूरातील आंदोलनाचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2019 03:45 PM2019-01-21T15:45:53+5:302019-01-21T16:06:51+5:30

शेती पंपांच्या वीज बिलातील पोकळ थकबाकी रद्द करावी, या मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशन व सर्व पक्षीयांतर्फे कोल्हापूरात शिरोली पुलावर आज सकाळपासून सुरु असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यात उंब्रजजवळची महामार्गावरील वाहतूक काहीकाळ रोखण्यात आली.

Traffic on the highway near Umbraj, | उंब्रजजवळ महामार्गावरील वाहतूक रोखली, कोल्हापूरातील आंदोलनाचा फटका

उंब्रजजवळ महामार्गावरील वाहतूक रोखली, कोल्हापूरातील आंदोलनाचा फटका

googlenewsNext
ठळक मुद्देउंब्रजजवळ महामार्गावरील वाहतूक रोखलीकोल्हापूरातील आंदोलनाचा फटका

सातारा : शेती पंपांच्या वीज बिलातील पोकळ थकबाकी रद्द करावी, या मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशन व सर्व पक्षीयांतर्फे कोल्हापूरात शिरोली पुलावर आज सकाळपासून सुरु असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यात उंब्रजजवळची महामार्गावरील वाहतूक काहीकाळ रोखण्यात आली.


महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशन व सर्व पक्षीयांतर्फे कोल्हापूरात शिरोली पुलावर आज सकाळपासून महामार्गावर चक्का जाम आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यातील पोलिसांनी तासवडे ते उंब्रज या मार्गावरील वाहतूक काही काळ रोखून धरली. यामुळे मोठ्या प्रमाणात महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. मामुळे महामार्गावर वाहनांची दुतर्फा रांग लागली होती. दुपारी आंदोलन मागे घेण्यात आल्यानंतर ही वाहतूक पूर्ववत करण्यात आली.

Web Title: Traffic on the highway near Umbraj,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.