खंबाटकी घाटात वाहतुकीचा चक्का जाम...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:38 AM2021-07-31T04:38:35+5:302021-07-31T04:38:35+5:30
खंडाळा : पुणे-सातारा महामार्गावरील खंबाटकी घाटात वळणावर एक ट्रक अचानक बंद पडल्याने घाटरस्ता मंद गतीने सुरू होता. ...
खंडाळा : पुणे-सातारा महामार्गावरील खंबाटकी घाटात वळणावर एक ट्रक अचानक बंद पडल्याने घाटरस्ता मंद गतीने सुरू होता. घाटात सकाळपासूनच जड वाहतूक करणाऱ्या वाहनांची मोठी गर्दी होती. खंबाटकी घाटाच्या मध्यावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे घाटात काही काळ वाहतूक ठप्प होती.
पुण्याहून-साताऱ्याकडे जात असताना घाटमाथ्यावर दत्तमंदिर व खामजाई मंदिराच्या परिसरात चारपदरीचे काम रखडल्याने येथे सिंगल लेन सुरू होते. यामुळे येथे वाहने बंद पडून अनेक वेळा घाट जॅम होत असतो; तसेच याही वेळी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास एक मालट्रक बंद पडल्याने वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती.
गेल्या आठ दिवसांपासून अतिवृष्टीमुळे महामार्ग बंदच होता. त्यामुळे गुरुवार (दि. २९) पासून महामार्गावर वाहनांची गर्दी होती. खंबाटकी घाटात वाहतुकीची अचानक कोंडी झाल्याने अनेकांची तारांबळ पाहायला मिळाली. त्यानंतर क्रेनने ट्रक बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत घाटातील वाहतूक धिम्या गतीने सुरू होती. घाटाच्या मध्यावर लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
३० खंडाळा
खंबाटकी घाटाच्या मध्यावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे घाटात काही काळ वाहतूक ठप्प होती.