वेळीच गाड्या फलाटाला लागत नसल्याने वाहतूक कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:43 AM2021-08-24T04:43:16+5:302021-08-24T04:43:16+5:30

सातारा : राज्य परिवहन महामंडळाच्या सातारा मध्यवर्ती बसस्थानकात प्रवेश केल्यानंतर गाड्या तत्काळ आपापल्या फलाटावर जात नाहीत. त्यामुळे सातारा मध्यवर्ती ...

Traffic jams as trains do not reach the platform on time | वेळीच गाड्या फलाटाला लागत नसल्याने वाहतूक कोंडी

वेळीच गाड्या फलाटाला लागत नसल्याने वाहतूक कोंडी

Next

सातारा : राज्य परिवहन महामंडळाच्या सातारा मध्यवर्ती बसस्थानकात प्रवेश केल्यानंतर गाड्या तत्काळ आपापल्या फलाटावर जात नाहीत. त्यामुळे सातारा मध्यवर्ती बसस्थानकाच्या प्रवेशद्वार अन् त्या बाहेर जंबो कोरोना सेंटरपर्यंत एसटीच्या गाड्या उभ्या असतात. त्यामुळे सातारकरांना मात्र नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे संबंधित चालकांना वेळीच सूचना करण्याची गरज आहे.

सातारा मध्यवर्ती बसस्थानक हे पुणे, कोल्हापूरच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे. त्याचप्रमाणे पुणे, मुंबईकडून कोकणात जाण्यासाठी साताऱ्यातूनच जावे लागते. तसेच बारामती, अहमदनगरकडे जाण्यासाठी साताऱ्यातून सोयीचा मार्ग आहे. सातारा जिल्ह्यातही वाई, महाबळेश्वर, पाचगणी, कास हे पर्यटनस्थळ, सज्जनगड, मांढरगड, शिखर शिंगणापूर हे धार्मिकस्थळे आहेत. त्यामुळे सातारा मध्यवर्ती बसस्थानकात राज्याच्या विविध भागातून एसटी येत असतात. त्यातून एसटीचा सर्वाधिक ताण सकाळी व सायंकाळी या बसस्थानकात येतो.

परजिल्ह्यातून येणाऱ्या गाड्यांनी तातडीने फलाटावर जाणे गरजेचे आहे. मात्र तसे होत नाही. ज्या गाड्यांना प्रवास साताऱ्यात संपतो त्या गाड्या प्रवेश द्वारातून आत आल्यावर काही अंतरावरच थांबतात. एसटीतील सर्व प्रवासी उतरेपर्यंत गाडी रस्त्यातच उभी असते. त्यामुळे पाठीमागून येणाऱ्या गाड्या एकामागे एक उभ्या असतात. ही रांग पुढे जंबो कोरोना सेंटरपर्यंत लागलेली असते. त्याचवेळी जिल्हा क्रीडा संकुलाकडून पोवईनाक्याकडे जाणाऱ्या सातारकरांना या वाहतुकीच्या कोंडीचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

कोट

सकाळच्या वेळी नोकरीसाठी कार्यालयात जाण्याची घाई असते. त्याचवेळी बसस्थानकासमोर वाहनांच्या रांगा लागलेल्या असतात. त्यामुळे उशीर होतो. हे टाळण्यासाठी एसटी महामंडळाने उपाययोजना कराव्यात.

- संतोष जमदाडे, सातारा.

फोटो :

२२जावेद०१

सातारा मध्यवर्ती बसस्थानकाच्या प्रवेशद्वारातून वाहनांच्या मोठ्या प्रमाणावर रांगा लागलेल्या असतात. (छाया : जावेद खान)

Web Title: Traffic jams as trains do not reach the platform on time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.