वाहतूक पोलिसांची गांधीगिरी..!

By Admin | Published: February 11, 2015 09:31 PM2015-02-11T21:31:08+5:302015-02-12T00:37:34+5:30

सुरक्षेचा संदेश : स्वत:पासून हेल्मेट वापरण्यास सुरुवात; जनजागृतीच्या दिशेने एक पाऊल पुढे

Traffic Police Gandhigiri ..! | वाहतूक पोलिसांची गांधीगिरी..!

वाहतूक पोलिसांची गांधीगिरी..!

googlenewsNext

सातारा : स्वसंरक्षणसाठी दुचाकीधारकांनी हेल्मेटचा वापर करणे गरजेचे आहे. मात्र, दुचाकीधारक या नियमांची पायमल्ली करताना दिसत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी चक्क वाहतूक पोलिसांनी स्वत:पासून सुरुवात करून नित्यनियमाने हेल्मेट वापरण्यास सुरुवात केली आहे.शासनाने हेल्मेट सक्ती केली असली तरी जिल्ह्यात अजूनही हेल्मेटच्या वापराबाबतत उदासीनता दिसून येत आहे. याला वाहनचालकांची मानसिकता जबाबदार असल्याचे दिसून येत आहे. हीच मानसिकता बदलण्यासाठी आता वाहतूक पोलिसांनी स्वत:पासून सुरुवात केली आहे. वाहतूक पोलीस आता हेल्मेटशिवाय बाहेर पडत नाहीत. विशेष म्हणजे, वाहतूक शाखेने चक्क हेल्मेटचा वापर न करणाऱ्या आपल्याच सहकाऱ्यावर कारवाई करून हेल्मेट किती नितांत गरजेचे आहे, याची शिस्त घालून दिली आहे. या कारवाईची धास्ती घेऊन पोलिसांनी आता स्वत:च्या सुरक्षेसाठी व इतरांना सुरक्षेबाबत जागृत करण्यासाठी डोक्यावर हेल्मेट परिधान केले आहे.काही कर्मचाऱ्यांना पोलीस प्रशासनाच्या वतीने हेल्मेट देण्यात आले आहेत. तर काहीनी स्वत: हेल्मेट विकत घेतली आहे. एका बाजूला पोलीस प्रशासन सुरक्षेबाबत सतर्क होत असताना इतर नागरिक मात्र याबाबत अजूनही उदासीन आहेत. काही वाहनचालक केवळ पोलिसांचा दंड चुकविण्यासाठी हेल्मेटचा वापर करतात. मात्र, असे न करता स्वत:च्या सुरक्षेची काळजी घेऊन ‘आपले आयुष्य आपल्या हाती’ या योजनेत सहभागी व्हावे, एवढीच अपेक्षा पोलिसांची आहे. (प्रतिनिधी)

न वापरण्याचे तोटे
धुळीमुळे श्वसनाचे विकार
डोळ्यांना त्रास
हवेचा कर्ण पलटलांवर परिणाम
अपघातात डोक्याचा इजा होण्याची अधिक शक्यता
असे झाल्यास स्मृतिभ्रंश होऊ शकतो
गंभीर दुखापत असल्यास मृत्यूही होऊ शकतो

वापराचे फायदे
जिल्ह्यामध्ये वर्षभरात सुमारे दोनशे दुचाकी अपघात झाले असून,अनेक वाहनचालकांना डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने प्राण गमवावे लागले आहे. मानवी शरीरात मेंदू हा अतिसंवेदनशील घटक आहे. अपघातात डोक्याला इजा झाल्यास मेंदूतून रक्तस्त्राव होतो, तर संबंधित व्यक्तीचा स्मृतिभ्रंश होऊ शकतो. दुखापत गंभीर असल्यास मृत्यू होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हेल्मेट वापरामुळे हा धोका टळू शकतो.

Web Title: Traffic Police Gandhigiri ..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.