पसरणी घाटात दरड कोसळल्याने वाहतूक विस्कळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:24 AM2021-07-23T04:24:11+5:302021-07-23T04:24:11+5:30

पाचगणी : सलग तीन दिवसांपासून पडत असलेल्या धुवाॅंधार पावसामुळे पसरणी घाटात दरड कोसळण्याचे सत्र सुरू झाले आहे. घाटातील दत्त ...

Traffic was disrupted due to landslides in Pasrani Ghat | पसरणी घाटात दरड कोसळल्याने वाहतूक विस्कळीत

पसरणी घाटात दरड कोसळल्याने वाहतूक विस्कळीत

Next

पाचगणी : सलग तीन दिवसांपासून पडत असलेल्या धुवाॅंधार पावसामुळे पसरणी घाटात दरड कोसळण्याचे सत्र सुरू झाले आहे. घाटातील दत्त मंदिराजवळ डोंगरमाथ्यावरील मोठमोठे दगड रस्त्यावर येऊन पडले असून, संरक्षक कठडाही ढासळला आहे. तर काही ठिकाणी मातीचा ढिगारा पसरला आहे. त्यामुळे वाहनधारकांना वाहन चालवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

पाचगणी - महाबळेश्वर या पर्यटन स्थळांकडे असंख्य वाहने या घाटातून ये-जा करत असतात. पावसाचा जोर वाढल्याने घाटातील दत्त मंदिरानजीक मोठमोठे दगड रस्त्यात पडले असून, त्यामधूनच वाहने पुढे नेली जात आहेत. संततधार पावसामुळे घाटातील बुवासाहेब मंदिरानजीकच्या वळणावर संरक्षण कठडा ढासळला आहे. या ढासळलेल्या कठड्याभोवती प्रशासनाने लोखंडी पिंप ठेवली असून, ती रात्री अंधारात व दाट धुक्यात वाहनधारकांना दिसत नसल्याने अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ३० जून रोजी दुरुस्तीच्या नावाखाली दिवसभर या घाटातील वाहतूक बंद करण्यात आली होती. निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे नागमोडी वळणावरील संरक्षक कठडे ढासळत असल्याचे म्हटले जात आहे.

फोटो : पसरणी घाटात डोंगर माथ्यावरील दरड कोसळण्यास सुरुवात झाली आहे.

Web Title: Traffic was disrupted due to landslides in Pasrani Ghat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.