साताऱ्यात रेल्वे अधिकाऱ्याला लाच घेताना पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2019 12:28 PM2019-09-20T12:28:36+5:302019-09-20T12:29:31+5:30
रेलरोकोमध्ये अटक केलेल्या संशयिताची कादपत्रे परत देण्यासाठी तीन हजारांची लाच घेताना क्षेत्र माहुली रेल्वे स्टेशनमधील उपनिरीक्षक एम. आय. बागवान याला पुणे सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले. या कारवाईनंतर अधिकाऱ्यांनी बागवान याच्या कोल्हापुरातील घरावरही छापा टाकला. ही कारवाई बुधवारी रात्री करण्यात आली.
सातारा : रेलरोकोमध्ये अटक केलेल्या संशयिताची कादपत्रे परत देण्यासाठी तीन हजारांची लाच घेताना क्षेत्र माहुली रेल्वे स्टेशनमधील उपनिरीक्षक एम. आय. बागवान याला पुणे सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले. या कारवाईनंतर अधिकाऱ्यांनी बागवान याच्या कोल्हापुरातील घरावरही छापा टाकला. ही कारवाई बुधवारी रात्री करण्यात आली.
याबाबत अधिक माहिती अशी, क्षेत्र माहुली रेल्वे स्टेशन कार्यालयामध्ये उपनिरीक्षक एम. आय. बागवान हा गेल्या दोन वर्षांपासून कार्यरत होता. काही महिन्यांपूर्वी एका संघटनेने रेलरोको केला होते. त्यावेळी बागवान याने आंदोलकांना अटक केली होती. संबंधित संशयितांकडून पॅनकार्डसह अन्य महत्त्वाची कागदपत्रे त्याने जप्त केली होती.
संबंधित तक्राराला जामिन मिळाल्यानंतर त्याने उपनिरीक्षक बागवान याला कादपत्रे परत करण्याची विनंतर केली. मात्र, बागवान याने त्याबदल्यात संबंधितांकडे तीन हजारांची मागणी केली. त्यामुळे तक्रारदाराने पुणे येथील सीबीआयच्या कार्यालयात जाऊन रितसर तक्रार दाखल केली.
त्यानुसार सीबीआयच्या टीमने बुधवारी सायंकाळी पाच वाजता क्षेत्र माहुली येथील रेल्वेच्या कार्यालयात बागवानला तीन हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. त्यानंतर सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी त्याला तो राहत असलेल्या शासकीय वसाहतीमधील घरात नेले.
या ठिकाणीही झडती घेण्यात आली. बागवान हा मुळचा कोल्हापूर येथील रहिवासी आहे. त्याच्या कोल्हापुरातील घरातही अधिकाऱ्यांनी झडती घेतली. मात्र, काहीही सापडले नसल्याचे सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.