सह्याद्री बफरमधील युवकांना प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:46 AM2021-03-01T04:46:07+5:302021-03-01T04:46:07+5:30

पाटण तालुक्यातील काठी, पलूस, झाडोली वसाहत व आंबेघर या पुनर्वसित गावांसह कोयना भागातील ५० प्रशिक्षणार्थींनी या कार्यशाळेचा लाभ घेतला. ...

Training of youth in Sahyadri buffer | सह्याद्री बफरमधील युवकांना प्रशिक्षण

सह्याद्री बफरमधील युवकांना प्रशिक्षण

Next

पाटण तालुक्यातील काठी, पलूस, झाडोली वसाहत व आंबेघर या पुनर्वसित गावांसह कोयना भागातील ५० प्रशिक्षणार्थींनी या कार्यशाळेचा लाभ घेतला. यावेळी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक उत्तम सावंत, वन्यजीव संरक्षक सुरेश साळुंखे, वनक्षेत्रपाल स्नेहल मगर, संदीप कुंभार उपस्थित होते.

या प्रशिक्षणामध्ये प्रथम प्रशिक्षण संस्थेमार्फत भारती प्रजापती यांनी मार्गदर्शन केले. प्रथम प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून बेरोजगार इच्छुक तरुण व तरुणींना चारचाकी व दुचाकी वाहने दुरुस्त करणे, इलेक्ट्रिशिअन, आरोग्य व्यवस्थापक, वेल्डिंग करणे, ब्यूटिपार्लर अशा प्रकारच्या कामांचे प्रशिक्षण देण्यात येते. राज्यातील विविध प्रशिक्षण केंद्रांत या विषयांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यामधून त्यांना विविध नामांकित कंपन्यांमध्ये रोजगार उपलब्ध करून दिले जाणार आहे. प्रथम प्रशिक्षण संस्था व सह्याद्री व्याघ्र प्रकल्प यांच्या माध्यमातून रोजगार निर्मितीच्या दिशेने एक पाऊल टाकण्यात येत आहे.

फोटो : २८केआरडी०३

कॅप्शन : कोयनानगर, ता. पाटण येथे सह्याद्रीच्या बफर क्षेत्रातील गावांमधील युवकांसाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी उत्तम सावंत, सुरेश साळुंखे, स्नेहल मगर यांची प्रमुख उपस्थिती होती.

Web Title: Training of youth in Sahyadri buffer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.