गाडे अन् गाड्या दोन्ही फूटपाथवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2019 11:08 PM2019-02-03T23:08:51+5:302019-02-03T23:08:55+5:30

सचिन काकडे। लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : राजवाडा, तांदूळआळी हा परिसर नागरिकांनी नेहमीच गजबजलेला असतो. वाहनांच्या व विक्रेत्यांच्या गर्दीतून ...

The trains and the trains on both the footpaths | गाडे अन् गाड्या दोन्ही फूटपाथवर

गाडे अन् गाड्या दोन्ही फूटपाथवर

Next

सचिन काकडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : राजवाडा, तांदूळआळी हा परिसर नागरिकांनी नेहमीच गजबजलेला असतो. वाहनांच्या व विक्रेत्यांच्या गर्दीतून वाट काढताना नागरिकांची येथे नेहमीच दमछाक होताना दिसते. असे असताना तांदूळआळीत असलेला फूटपाथ मात्र वापराविना पडून आहे. याचा उपयोग पार्किंग व हातगाडे लावण्यासाठी केला जात आहे.
राजवाडा बसस्थानकातून दररोज हजारो प्रवासी ये-जा करतात. या ठिकाणी तीन रिक्षा स्टॉप असून, फळ व भाजीविक्रेत्यांची संख्याही सर्वाधिक आहे. चौपाटीवर जाण्यासाठी याच मार्गाचा वापर होतो. शाळकरी मुले व नोकरदारांची येथे वर्दळ असते. शिवाय ग्रामीण भागातून खरेदीसाठी येणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. नागरिकांच्या अन् वाहनांच्या गर्दीने राजवाड्याचा परिसर नेहमीच गजबलेला असतो. तांदूळआळीत नगरवाचनालयाच्या एका बाजूला रिक्षा स्टॉप असून, दुसºया बाजूला टेम्पो उभे केले जातात. निम्म्याहून अधिक रस्ता वाहनांनी व्यापल्याने पादचाºयांना धोका पत्करून रस्त्याच्या मधूनच चालावे लागते.
येथील फूटपाथचा उपयोग चालण्यासाठी कमी अन् इतर कारणांसाठीच अधिक केला जात आहे. या फूटपाथवर हातगाडे लावले जात आहेत. पार्किंगला जागा नसल्याने दुचाकीचालक फूटपाथवरच आपल्या गाड्या पार्क करीत आहेत. फूटपाथ असूनही नागरिकांना रस्त्यावरून चालावे लागत असल्याने फूटपाथ नक्की बांधला तरी कशाला, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
नागरिकांना हवा हक्काचा फूटपाथ
तांदूळआळीतील वाहनांच्या गर्दीतून वाट काढताना प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिक व महिलांना धोका पत्करून चालावे लागते. आजपर्यंत या ठिकाणी अनेक अपघात झाले असून, कित्येकजण जखमी झाले आहेत. तसेच सिग्नल व्यवस्था अनेक वर्षांपासून बंद असल्याने वाहतुकीची नेहमीच कोंडी होत असते. प्रशासनाच्या वतीने ही बाब गांभीर्याने घेऊन किमान पादचाºयांना तरी हक्काचा फूटपाथ उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी होत आहे.

Web Title: The trains and the trains on both the footpaths

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.