सातारा जिल्ह्यातील पाच गटविकास अधिकाऱ्यांची बदली
By नितीन काळेल | Published: February 24, 2024 06:25 PM2024-02-24T18:25:20+5:302024-02-24T18:26:22+5:30
सातारा : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार राज्यातील गटविकास अधिकाऱ्यांची बदली प्रक्रिया राबविण्यात आली आहे. त्यानुसार सातारा जिल्ह्यातील ...
सातारा : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार राज्यातील गटविकास अधिकाऱ्यांची बदली प्रक्रिया राबविण्यात आली आहे. त्यानुसार सातारा जिल्ह्यातील पाच गटविकास अधिकाऱ्यांची बदली झाली आहे. तसेच काही ठिकाणी नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
माण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रशांत राऊत यांची सांगली जिल्ह्यातील कडेगाव येथे, कोरेगावचे गटविकास अधिकारी किशोर माने यांची पुणे विभागीय आयुक्त कार्यालय येथे ‘रोहयो’च्या उपमुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर वाईचे गटविकास अधिकारी नारायण घोलप यांची शिरोळ (कोल्हापूर) पंचायत समितीच्या गटविकास अधिकारीपदी,
खंडाळा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अनिल वाघमारे यांची पालघरच्या जलजीवन मिशन प्रकल्प संचालकपदी तसेच खटावचे गटविकास अधिकारी सर्जेराव पाटील यांची हातकणंगले गटविकास अधिकारीपदी नियुक्ती झाली आहे. खटाव पंचायत समितीच्या गटविकास अधिकारीपदी नव्याने वैभव सापळे, खंडाळा गटविकास अधिकारीपदी शबाना बेगम मोकाशी, कोरेगाव पंचायत समितीच्या गटविकास अधिकारीपदी सुप्रिया चव्हाण यांची नियुक्ती झाली आहे.