ग्रामस्थांच्या उठवातून सर्जापूर शाळेचा कायापालट, शाळासिद्धीत जावळीत प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2019 01:54 PM2019-01-29T13:54:52+5:302019-01-29T13:56:31+5:30

उद्याचे भवितव्य घडविणाऱ्या, देशाचा सुसंस्कृत आदर्श नागरिक निर्माण करण्यासाठी परिश्रम घेणाºया ज्ञानमंदिरासाठी सर्जापूर ग्रामस्थांनी मदतीचा हात दिला. सुमारे साडेतीन लाखांची मदत मिळाली. त्यातून जावळीतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा चेहरामोहराच बदलला. शाळासिद्धीत ही शाळा तालुक्यात प्रथम ठरली आहे.

The transformation of Sarjapur school from the rise of villagers, first in the school system | ग्रामस्थांच्या उठवातून सर्जापूर शाळेचा कायापालट, शाळासिद्धीत जावळीत प्रथम

ग्रामस्थांच्या उठवातून सर्जापूर शाळेचा कायापालट, शाळासिद्धीत जावळीत प्रथम

googlenewsNext
ठळक मुद्देग्रामस्थांच्या उठवातून सर्जापूर शाळेचा कायापालटशाळासिद्धीत जावळीत प्रथम : शाळेस साडे तीन लाखांची मदत

सायगाव : उद्याचे भवितव्य घडविणाऱ्या, देशाचा सुसंस्कृत आदर्श नागरिक निर्माण करण्यासाठी परिश्रम घेणाºया ज्ञानमंदिरासाठी सर्जापूर ग्रामस्थांनी मदतीचा हात दिला. सुमारे साडेतीन लाखांची मदत मिळाली. त्यातून जावळीतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा चेहरामोहराच बदलला. शाळासिद्धीत ही शाळा तालुक्यात प्रथम ठरली आहे.

जिल्हा मध्यवर्ती बँकेचे सेवानिवृत्त विकास अधिकारी विश्वासराव बोराटे यांनी प्राथमिक शाळेसाठी सुमारे दीड लाख रुपये खर्च करून प्लेवर्स ब्लॉक व किचन शेडची फरशी बदलण्यासाठी मदत केली. त्यामुळे शाळेचा परिसर सुशोभित होण्यास मदत झाली. इतरांनीही यांचा आदर्श घेऊन समाजकार्यासाठी प्रयत्न करावेत, असा मनोदय माजी सरपंच प्रकाशराव मोहिते यांनी व्यक्त केला.

शाळेसाठी या सुविधा समर्पित करण्यात आल्या. अलीकडच्या काळात इंग्रजी माध्यमांच्या स्पर्धेत गावातील प्राथमिक शाळाही कुठेच कमी पडत नाहीत. विध्यार्थ्यांना सुविधा पुरविण्यासाठी ग्रामस्थ, शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षकांची सतत धडपड आहे. या कार्यात गावातील युवकांचे मोलाचे योगदान मिळाले.

शाळेसाठी वैभव बोराटे यांच्या माध्यमातून ग्रंथालयासाठी कपाटे, पुस्तके व शालोपयोगी साहित्य देण्यात आले. आधुनिक तंत्रज्ञानाचा अध्यापनात वापर व्हावा, या हेतूने सुभाष मापारी, मोहन मोहिते यांनी संगणकाची उपलब्धता करून दिली. गावच्या या योनदानाबद्दल गटशिक्षणाधिकारी रमेश चव्हाण, विस्तराधिकारी कल्पना तोडरमल, केंद्रप्रमुख अरविंद दळवी, उपसरपंच सुशीला जाधव यांनी आभार व्यक्त केले.

शाळेला अ मानांकन

शाळेने आयएसओ मानांकन व शालासिद्धी अ श्रेणी मिळवलेली आहे. यासाठी येथील ग्रामस्थ, आजी शिक्षक सर्वांचेच सहकार्य लाभले आहे. जावली तालुक्यातील एक आदर्श प्राथमिक शाळा निर्माण होण्यात येथील मुख्याध्यापक शकील पटेल, उपशिक्षिका आश्विनी बोराटे-गार्डी याचा सिंहाचा वाटा आहे.

Web Title: The transformation of Sarjapur school from the rise of villagers, first in the school system

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.