साताऱ्यातील उपजिल्हाधिकाऱ्यांच्या जिल्ह्याबाहेर बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2018 01:51 PM2018-08-24T13:51:53+5:302018-08-24T13:54:52+5:30

सातारा जिल्ह्यात भूसंपादन विभागाचे उपजिल्हाधिकारी पद अनेक महिन्यांपासून रिक्त होते. या पदावर अखेर भोरच्या प्रांताधिकारी मोसमी बर्डे-चौगुले यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Transit of Sub-District Collectorate of Satara | साताऱ्यातील उपजिल्हाधिकाऱ्यांच्या जिल्ह्याबाहेर बदल्या

साताऱ्यातील उपजिल्हाधिकाऱ्यांच्या जिल्ह्याबाहेर बदल्या

Next
ठळक मुद्देस्नेहा किसवे नव्या जिल्हा पुरवठा अधिकारी  भूसंपादन उपजिल्हाधिकारीपदी पूर्णवेळ अधिकाऱ्यांची नियुक्ती

सातारा : सातारा जिल्ह्यात भूसंपादन विभागाचे उपजिल्हाधिकारी पद अनेक महिन्यांपासून रिक्त होते. या पदावर अखेर भोरच्या प्रांताधिकारी मोसमी बर्डे-चौगुले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. साताऱ्यांच्या प्रांताधिकारी स्वाती देशमुख-पाटील व वाईच्या प्रांताधिकारी अस्मिता मोरे तसेच वाईचे तहसीलदार अतुल म्हेत्रे, कऱ्हाडचे तहसीलदार राजेंद्र शेळके, खटावचे तहसीलदार सुशील बेल्हेकर यांच्या बदल्या झाल्या आहेत.

शासनाने महसूल विभागातील प्रांताधिकारी (उपजिल्हाधिकारी) दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्या केल्या आहेत. साताऱ्याच्या प्रांताधिकारी स्वाती देशमुख-पाटील यांची सांगलीच्या भूसंपादन क्र. ६ उपजिल्हाधिकारी पदावर बदली झाली. वाईच्या प्रांताधिकारी अस्मिता मोरे यांची पुणे जिल्हा अन्नधान्य वितरण अधिकारी म्हणून बदली झाली. तर जिल्हा पुरवठा अधिकारी
वसुंधरा बारवे यांची भूसंपादन क्र. १ उपजिल्हाधिकारी सांगली येथे बदली झाली आहे.

सिडकोचे उपजिल्हाधिकारी विजयसिंह पाटील यांची सातारा प्रांताधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. गडहिंग्लजच्या प्रांताधिकारी संगीता चौगुले-राजापूरकर यांची वाई प्रांताधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. पुणे येथील सहायक आयुक्त स्नेहा किसवे या आता जिल्हा पुरवठा अधिकारी म्हणून कार्यभार पाहणार आहेत.

दरम्यान, सातारा भूसंपादन क्र. ९ हे पद अनेक दिवसांपासून रिक्त होते. तत्कालीन अधिकाऱ्यांच्या बदलीनंतर या ठिकाणी पूर्णवेळ अधिकारीच उपलब्ध झाला नव्हता. जिल्ह्यात सध्या राष्ट्रीय तसेच राज्य महामार्गाच्या रुंदीकरणाची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर पूर्णवेळ अधिकारी उपलब्ध झाल्याने या विभागाचे काम सुरळीतपणे सुरू राहण्यास मदत होणार आहे.

भोरच्या तहसीलदार वर्षा शिंगण यांची सातारा जिल्हा सहायक पुरवठा अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. कऱ्हाडचे तहसीलदार राजेंद्र शेळके यांची उजनी प्रकल्प तहसीलदार पुनर्वसन पदावर बदली झाली आहे. या जागी गडहिंग्लजचे तहसीलदार राजेश चव्हाण यांची नियुक्ती झाली आहे.

माळशिरसच्या तहसीलदार बी. एस. माने यांची माण तहसीलदार म्हणून नियुक्ती झाली. हातकणंगलेच्या तहसीलदार वैशाली राजमाने यांची संजय गांधी योजनेच्या तहसीलदार (सातारा) पदी नियुक्ती झाली आहे.

वाईचे तहसीलदार अतुल म्हेत्रे यांची पुरंदरचे तहसीलदार म्हणून बदली झाली आहे. त्यांच्या जागी महाबळेश्वरचे तहसीलदार रमेश शेंडगे यांची नियुक्ती झाली असून महाबळेश्वरचे तहसीलदार म्हणून विभागीय आयुक्त कार्यालयातील तहसीलदार मिनल कणसकर यांची नियुक्ती झाली.

संजय गांधी योजना (सातारा) तहसीलदार जयश्री आव्हाड यांची खटावच्या तहसीलदार म्हणून नियुक्ती झाली आहे. खटावचे तहसीलदार सुशील बेल्हेकर यांची करमाळा तहसीलदार म्हणून बदली झाली.

राजेश चव्हाण पुन्हा सातारा जिल्ह्यात

साताऱ्याचे तत्कालीन तहसीलदार राजेश चव्हाण हे तीन वर्षांपूर्वी गडहिंग्लज (कोल्हापूर) येथे तहसीलदार म्हणून बदलून गेले होते. आता ते पुन्हा एकदा सातारा जिल्ह्यात बदलून आले असून कऱ्हाडचे तहसीलदार म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Web Title: Transit of Sub-District Collectorate of Satara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.