परिवहन कार्यालयाची दरनिश्चती अन्यायकारक !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:42 AM2021-05-25T04:42:59+5:302021-05-25T04:42:59+5:30
येथील शिवछावा चौकात बैठक लोकमत न्यूज नेटवर्क मलकापूर : उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून रुग्णवाहिकांसाठी पूर्वी भाडेदर निश्चित केले होते. या ...
येथील शिवछावा चौकात बैठक
लोकमत न्यूज नेटवर्क
मलकापूर : उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून रुग्णवाहिकांसाठी पूर्वी भाडेदर निश्चित केले होते. या जुन्या दरपत्रकानुसारच रुग्णाच्या नातेवाइकांकडून भाडे घ्यावे असा आदेश पुन्हा काढण्यात आला आहे. मात्र, सध्या पेट्रोल-डिझेलची भरमसाठ दरवाढ झाली आहे. याशिवाय कोरोना काळामध्ये ऑक्सिजन, सॅनिटायझर, पीपीई किटचा वापर वाढल्यामुळे या दराने भाडे घेणे परवडत नाही, अशी आक्रमक भूमिका शिवछावा चौकात झालेल्या बैठकीत घेण्यात आली आहे. या अन्यायकारक निर्णयाचा कऱ्हाड तालुक्यातील रुग्णवाहिका चालक-मालक संघटनेकडून निषेध करण्यात आला.
कऱ्हाड तालुक्यातील रुग्णवाहिका चालक-मालक संघटनेची येथील शिवछावा चौकात सोमवारी बैठक झाली. बैठकीस १६ रुग्णवाहिकांचे चालक व मालक वाहनांसह सहभागी झाले होते. बैठकीत उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून रुग्णवाहिकांसाठी पूर्वी भाडेदर निश्चिती या विषयावर चर्चा करण्यात आली.
बैठकीनंतर बोलताना रुग्णवाहिका संघटनेचे पदाधिकारी म्हणाले, ‘१४ जुलै २०२० ला प्रादेशिक परिवहन कार्यालयाने मारुती व्हॅन १३ रुपये, टाटा सुमो मेटॅडोअर १३ रुपये, टाटा ४०७ साठी १४ रुपये, एसी रुग्णवाहिकेसाठी २० रुपये प्रति किलोमीटर असे दर निश्चित करण्यात केले होते. त्यावेळी डिझेलचा ७० रुपये, तर पेट्रोलचा ८९ रुपये प्रतिलिटर दर होता. आता डिझेल ९०, तर पेट्रोल १०० रुपयांवर गेले आहे. याशिवाय कोरोनामुळे ऑक्सिजन, सॅनिटायझर, पीपीई किट, ग्लोव्हजचा वापर वाढला, तसेच प्रत्येक रुग्णाला रुग्णालयात सोडल्यानंतर रुग्णवाहिका सॅनिटाईज, तसेच सर्व्हिसिंग करावी लागते. त्याचा अतिरिक्त खर्च होत असला तरी या गोष्टी आताच्या काळात करणे गरजेचे आहे. लोकांना सुरक्षित व चांगली सेवा देणे हा यामागचा हेतू असल्याने उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने कोरोना काळाचा विचार करून योग्य दर निश्चित करावेत, अशी संघटनेची मागणी असल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
यावेळी संघटनेचे अध्यक्ष सुजय पाटील, प्रसाद रहना, प्रफुल्ल बाबर, शेखर बर्गे, समीर केंजळे, राहुल मोहिते, विजय कोळेकर, उमेश गोसावी, संकेत गावरे, जावेद नायकवडी, मुस्ताक शेख, विजय चव्हाण, प्रवीण शेळके, बबन पाटील आदींची उपस्थिती होती.
कोट..
आमच्या मागणीचा विचार परिवहन कार्यालयासह शासनाने करावा. जुन्या भाडे दरसक्तीचा आम्ही निषेध करीत असलो तरी या महामारीच्या काळात आमची रुग्णसेवा यापुढेही अखंडपणे सुरूच ठेवणार आहोत. मागण्या मान्य करेपर्यंत आम्ही ठरविलेल्या दराप्रमाणेच भाडे घेणार आहोत. जर एखाद्यावर कारवाई झाल्यास आमची पुढील आंदोलनाची दिशा त्याच दिवशी ठरवू.
-सुजय पाटील, संघटनेचे अध्यक्ष.
फोटो ओळी..
२४मलकापूर ॲम्ब्युलन्स
कऱ्हाड तालुक्यातील रुग्णवाहिका चालक-मालक संघटनेची येथील शिवछावा चौकात सोमवारी बैठक झाली. बैठकीस १६ रुग्णवाहिकांचे चालक व मालक वाहनांसह सहभागी झाले होते. (छाया : माणिक डोंगरे)
===Photopath===
240521\img_20210524_115045.jpg
===Caption===
कराड तालुक्यातील रूग्णवाहिका चालक-मालक संघटनेची येथील शिवछावा चौकात आज बैठक झाली. बैठकीस १६ रूग्णवाहिकेचे चालक व मालक वाहनांसह सहभागी झाले होते. (छाया- माणिक डोंगरे)