लोणंद बाजार आवारात एसटीतून कांद्याची वाहतूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2020 16:24 IST2020-06-27T16:23:13+5:302020-06-27T16:24:37+5:30
लोणंदचा कांदा देश-विदेशात प्रसिद्ध आहे. या कांद्याने आजवर संकटात असलेल्या शेतकऱ्यांना तारले आहे. कांदा आजवर मालट्रक, रेल्वेने तर इतर प्रदेशात जहाजाने व विमानानेही गेला आहे. कोरोनामुळे संकटात सापडलेल्या एसटीला लोणंदच्या कांद्यानेही मदतीचा हात दिला आहे. लोणंदचा कांदा शुक्रवारी प्रथमच एसटीने पाठविण्यात आला.

लोणंद बाजार समितीतून कांदा शुक्रवारी एसटीतून कऱ्हाड पाठविण्यात आला. यावेळी दत्तात्रय बिचुकले, सचिव विठ्ठल सपकाळ, सहायक सचिव शेळके व इतर कर्मचारी तसेच व्यापारी राजू अग्रवाल, गोकुळदास शहा, रामदास सोळस्कर उपस्थित होते.
संतोष खरात
लोणंद : लोणंदचा कांदा देश-विदेशात प्रसिद्ध आहे. या कांद्याने आजवर संकटात असलेल्या शेतकऱ्यांना तारले आहे. कांदा आजवर मालट्रक, रेल्वेने तर इतर प्रदेशात जहाजाने व विमानानेही गेला आहे. कोरोनामुळे संकटात सापडलेल्या एसटीला लोणंदच्या कांद्यानेही मदतीचा हात दिला आहे. लोणंदचा कांदा शुक्रवारी प्रथमच एसटीने पाठविण्यात आला.
सर्वसामान्यांची जीवनवाहिनी राहिलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या फेऱ्या कोरोनानंतर सुरक्षेच्या कारणाने बंद करण्यात आल्या होत्या. लॉकडाऊनमध्ये जिल्ह्यात अडकलेल्या परप्रांतीयांना मूळगावी जाण्यासाठी एसटीने मोठी भूमिका पार पाडली. आता जिल्हांतर्गत फेºया सुरू आहेत. पण प्रवासीच अध्याप बाहेर पडत नाहीत. तसेच एका फेरीत निम्मेच प्रवासी घ्यायचे असल्याने एसटी अडचणीत येऊ लागली आहे.
एसटीची ही परिस्थिती सुधारण्यासाठी आजवर प्रवासी वाहतूक करणारी एसटी आता मालवाहतूकही करेल, असा निर्णय एसटी प्रशासनाने घेतला. त्याला राज्यभरात सुरुवातही झाली आहे. सातारा विभागाचे वरिष्ठ अधिकारीही यासाठी प्रयत्न करत आहेत. आजवर पुणे, मुंबईला माल वाहतूक एसटीने केली आहे. आता बाजार समितीतील कृषी माल पोहोचविला आहे.
लोणंद बाजार आवारात कांद्याची वाहतूक एसटीने महामंडळामार्फत चालू केली असून, खंडाळा आगाराने त्याची व्यवस्था केली. शुक्रवारी लोणंद मार्केट यार्डमधील कांद्याचे व्यापारी राजू अग्रवाल यांनी कऱ्हाड येथे कांदा एसटी मार्फत पाठविला.
यावेळी बाजार समितीचे उपसभापती दत्तात्रय बिचुकले, सचिव विठ्ठल सपकाळ, सहायक सचिव शेळके व इतर कर्मचारी तसेच व्यापारी राजू अग्रवाल, गोकुळदास शहा, रामदास सोळस्कर, हमाल तसेच कऱ्हाड येथील कांदा व्यापारी संतोष बागल, अमोल कांबळे उपस्थित होते.