स्वातंत्र्याच्या बहात्तरीनंतरही आबालवृद्धांचा झोळीतून प्रवास- पाठरवाडीतील अवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2018 01:01 AM2018-05-04T01:01:56+5:302018-05-04T01:01:56+5:30

तांबवे : रस्ता हे दळणवळणाचे विकासातील मुख्य साधन आहे. मात्र, स्वातंत्र्याच्या बहात्तरीनंतर अजूनही डोंगरावर वसलेल्या पाठरवाडी गावाला रस्ताच नाही. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान भैरवनाथ देवस्थान म्हणून प्रसिद्ध

Traveling through the bushes even after the freedom of independence - the state of Patharwadi | स्वातंत्र्याच्या बहात्तरीनंतरही आबालवृद्धांचा झोळीतून प्रवास- पाठरवाडीतील अवस्था

स्वातंत्र्याच्या बहात्तरीनंतरही आबालवृद्धांचा झोळीतून प्रवास- पाठरवाडीतील अवस्था

googlenewsNext
ठळक मुद्देरस्त्याअभावी ग्रामस्थांची पायपीट; सोसतायंत मरणयातना

दीपक पवार ।
तांबवे : रस्ता हे दळणवळणाचे विकासातील मुख्य साधन आहे. मात्र, स्वातंत्र्याच्या बहात्तरीनंतर अजूनही डोंगरावर वसलेल्या पाठरवाडी गावाला रस्ताच नाही. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान भैरवनाथ देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या पाठरवाडीकरांची रस्त्याअभावी सध्या परवडच सुरू आहे. येथील आबालवृद्धांना झोळीतून प्रवास करावा लागतोय तर पावसाळ्यात येथील लोक मरणयातनाच सोसतात.

पुढारलेल्या पश्चिम महाराष्ट्रातील कºहाडसारख्या सधन तालुक्यातील पाठरवाडीकरांनी अनेकदा गावाच्या रस्त्यासाठी अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला. मात्र, शासनाकडून याकडे दुर्लक्ष केले जात आहे.
तांबवे गावच्या पश्चिमेकडील डोंगरावर पाठरवाडी गाव वसले आहे. गमेवाडी ग्रामपंचायतीचा एक भाग म्हणून पाठरवाडी गणली जाते. तेथे पश्चिम महाराष्ट्रासह कर्नाटकातील भाविकांचे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कुलदैवत भैरवनाथाचे मोठे मंदिर आहे. तेथे यात्रेसाठी दरवर्षी मोठी गर्दी असते. मात्र संबंधित भाविकांना दरवर्षी देवदर्शनासाठी पाठरवाडीच्या डोंगरावर पायी चालत जावे लागते. त्यामुळे त्यांचे मोठी अडचण होते.
त्याचबरोबर पाठरवाडीला रस्ता नसल्याने तेथील आबालवृध्दांना दैनंदिन व्यवहारासह, शिक्षण, आरोग्याच्या सेवांसाठी डोंगर उतरून खाली असलेल्या तांबवे येथे ये-जा करावे लागते. महिलांचा प्रसूती किंवा वयोवृद्ध महिला, पुरुष आजारी पडल्यावर त्यांना पाळणा किंवा झोळीतून खांद्यावरून डोंगर उतरून खाली आणावे लागते व परत वर न्यावे लागते. गावच्या रस्त्यासाठी अनेकांकडे पत्रव्यवहार करूनही त्याकडे
कोणीही लक्ष द्यायला तयार नाही. ३०० ते ४०० लोकसंख्या असलेल्या
या वाडीगावाच्या रस्त्याच्या प्रतीक्षेत सध्या पाठरवाडी ग्रामस्थ
आहेत.

बिबट्याची
नेहमीच दहशत
पाठरवाडी हे डोंगरावर सह्याद्रीच्या कुशीत वसलेले गाव आहे. तेथे गडद झाडी असल्याने त्या परिसरात असलेल्या वाघधुंडी गुहेत बिबट्याचे कायमच वास्तव्य असते. त्यामुळे रात्रीच्यावेळी पाठरवाडीत जाताना किंवा पहाटेच्यावेळी पाठरवाडीचा डोंगर उतरून खाली येत असताना विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांना बिबट्याची चांगलीच धास्ती असते. अनेकदा बिबट्याचे राजरोस दर्शन होत असल्याने त्याच्या दहशतीतीच जीव मुठीत धरून लोकांना तेथे राहावे लागते.

विद्यार्थ्यांचा दररोज
पायी प्रवास
पाठरवाडीतून शाळेसाठी दररोज येथील विद्यार्थ्यांना पाऊलवाटेने खाली यावे लागते. पावसाळा, हिवाळा तसेच उन्हाळा अशा तिन्हीही ऋतूत विद्यार्थ्यांना खडतर प्रवास करावा लागतो. त्यामुळे त्यांना शिक्षण घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात अडचण निमाण होते.

मुलांच्या
लग्नाचा प्रश्न
पाठरवाडी हे साठ ते सत्तर हुंबरा असलेले गाव आहे. तेथील मुलांना शाळेसाठी दररोज डोंगरातील पाऊलवाटेने प्रवास करावा लागतो. शिक्षण घेऊन मोठे झाल्यावर नोकरी लागली तरी हे गाव डोंगरावर वसलेले असल्यामुळे येथील अनेक मुलांना लग्नासाठी मुलीच मिळत नाहीत, अशी स्थिती आहे. का तर गावाला रस्ता नाही. नोकरी नसलेल्यांची तर फारच वाईट स्थिती आहे.

आमच्या गावाला अनेक वर्षांपासून रस्त्याची समस्या हाय. एखादी महिला आजारी फडली तर तिला झोळीतून आणावं लागत. गरदोर महिलाची तर लयच वाईट अवस्था होते. काही वेळा अनेक महिलांना आपल्या जीवाला मुकावं लागलं हाय. कुठेही सरकार आलं तरी आम्हाकडं कुणाचं लक्ष न्हाय. स्वातंत्र्य मिळून किती वर्षे झाली तरी रस्ता नाही.
- रुक्मिणी यादव
गृहिणी, पाठरवाडी,
ता. कºहाड

पाठरवाडी, ता. कºहाड येथे रस्त्याअभावी वयोवृद्धांना ग्रामस्थांकडून उपचारासाठी झोळीतून न्यावे लागत आहे.

Web Title: Traveling through the bushes even after the freedom of independence - the state of Patharwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.