वृक्ष संवर्धन मानवाच्या आरोग्यासाठी आवश्यक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:26 AM2021-07-04T04:26:10+5:302021-07-04T04:26:10+5:30
वडूज : ‘धगधगत्या जीवनात मानवाच्या जीवनात आरोग्यदायी राहणीमानात प्राणवायूसह फळे व फुलांची बरसात करणारे अनेक देशी झाडे आहेत. ...
वडूज : ‘धगधगत्या जीवनात मानवाच्या जीवनात आरोग्यदायी राहणीमानात प्राणवायूसह फळे व फुलांची बरसात करणारे अनेक देशी झाडे आहेत. त्याचप्रकारचे वृक्ष संवर्धन करणे मानवाच्या आरोग्यासाठी यापुढील काळात आवश्यक आहे,’ असे मत उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. नीलेश देशमुख यांनी केले.
येथील ग्रामीण रुग्णालय परिसरात वृक्षारोपण कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी वनक्षेत्रपाल शीतल फुंदे, मुख्याधिकारी माधव खांडेकर, वक्रतुंड चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष नितीन गोडसे, भरत घनवट, संतोष भोसले, प्रकाश गोडसे, सेवानिवृत्त क्रीडा शिक्षक राजेंद्र पवार आदींची प्रमुख उपस्थिती होती.
उपविभागीय पोलीस अधिकारी देशमुख म्हणाले, ‘खटाव तालुक्याचे मुख्यालय असलेल्या वडूज शहरातील ग्रामीण रुग्णालय परिसरात कोरोना लसीकरण, माॅड्युलर जम्बो कोरोना केंद्रासह रुग्णांसाठी अनेक सोयी सुविधा उपलब्ध आहेत. या परिसरात वक्रतुंड चॅरिटेबल ट्रस्टने वृक्षलागवड करून वृक्ष संवर्धनाची जबाबदारी घेतल्याने या परिसरातील वातावरण निरोगी व आल्हाददायक राहणार आहे.’
यावेळी वनक्षेत्रपाल शीतल फुंदे, संतोष भोसले आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी संभाजी गोडसे, विजयकुमार शेटे, सोमनाथ गोडसे, रोहित माळी, श्रीकांत तोडकर, कुंदन तोडकर, रवींद्र गोडसे, हृषीकेश घनवट, डाॅ. सौरभ जोशी आदींसह ट्रस्टचे पदाधिकारी उपस्थित होते.
०३वडूज
फोटो : वडूज ग्रामीण रुग्णालय येथे वृक्षारोपण करताना उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. नीलेश देशमुख, वनक्षेत्रपाल शीतल फुंदे, नितीन गोडसे आदी उपस्थित होते. (छाया : शेखर जाधव )
-------------------------------------
------------------------------