महिमानगड फाऊंडेशनच्यावतीने वृक्षारोपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:26 AM2021-06-24T04:26:08+5:302021-06-24T04:26:08+5:30
पुसेगाव : ‘गड, किल्ले संवर्धनासोबतच सामाजिक ...
पुसेगाव : ‘गड, किल्ले संवर्धनासोबतच सामाजिक बांधिलकी जपत महिमानगड फाऊंडेशन या सामाजिक संस्थेने माण व खटाव तालुक्यांतील अनेक गावांमध्ये कोरोना काळात आरोग्य किटचे वाटप केले. प्राथमिक आरोग्य केंद्र आवारात वृक्षारोपणही करण्यात आले.
यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष हर्षवर्धन ऊर्फ गणेश गोडसे, आरोग्य अधिकारी डॉ. मेघना पाटील, सुवर्णा गोडसे, महिमानगड फाऊंडेशनचे उपाध्यक्ष मोहन तोडकर, डिस्कळचे सरपंच महेश पवार, उपसरपंच संदीप कर्णे, अनिलकुमार गोडसे, ज्येष्ठ नागरिक संघाचे बापूराव कर्णे, रविराज लाड, सदाशिव घाडगे, प्रदीप गोडसे, डॉ. बी. एन. घाडगे, पै. मनोहर आडके, दत्तात्रय मदने, लक्ष्मण निकम, अमोल गरड, सतीश निकम, पांडुरंग निकम आदी ग्रामस्थ व आरोग्य केंद्रातील कर्मचारी उपस्थित होते. यावेळी फाऊंडेशनचे अध्यक्ष गोडसे यांनी संस्थेच्या गड, किल्ले संवर्धन व सामाजिक कार्याबद्दल माहिती दिली. या कार्याबद्दल आरोग्य केंद्र व ग्रामपंचायतीतर्फे फाऊंडेशनचे आभार मानण्यात आले.
२३ पुसेगाव वृक्षारोपण
महिमानगड फाऊंडेशनतर्फे आरोग्य केंद्रावर वृक्षारोपण करण्यात आले.