तरडगावमध्ये पालखीतळ परिसरात वृक्षारोपण !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:26 AM2021-07-02T04:26:36+5:302021-07-02T04:26:36+5:30

तरडगाव : कृषिदिनाचे औचित्य साधून तरडगाव, ता. फलटण येथील संत ज्ञानेश्वर महाराज पालखीतळ परिसरात कृषिकन्या वैष्णवी गायकवाड, प्रणिता चव्हाण ...

Tree planting in Palkhital area in Tardgaon! | तरडगावमध्ये पालखीतळ परिसरात वृक्षारोपण !

तरडगावमध्ये पालखीतळ परिसरात वृक्षारोपण !

Next

तरडगाव : कृषिदिनाचे औचित्य साधून तरडगाव, ता. फलटण येथील संत ज्ञानेश्वर महाराज पालखीतळ परिसरात कृषिकन्या वैष्णवी गायकवाड, प्रणिता चव्हाण यांनी वृक्षारोपणाचा उपक्रम राबविला.

या वेळी पेरू, आंबा, जांभूळ, चिंच अशा विविध प्रकारच्या वृक्षाच्या रोपांची लागवड करण्यात आली. अलीकडच्या काळात वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास मोठ्या प्रमाणात झाला आहे. त्याचा समतोल राखण्यासाठी वृक्षलागवड काळाची गरज बनली आहे. याची जाणीव ठेवत आम्ही हा उपक्रम राबविला असून, समाजातील प्रत्येक घटकाने वृक्षसंख्या वाढविण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन कृषिकन्या वैष्णवी गायकवाड यांनी केले. या वेळी उपसरपंच प्रदीप गायकवाड, ग्रामविकास अधिकारी दादासाहेब धायगुडे, ग्रामपंचायत सदस्य संतोष कुंभार, दीपक गायकवाड, संदीप शिंदे, किरण गायकवाड, मोहन गायकवाड आदी उपस्थित होते.

०१तरडगाव

तरडगाव, ता. फलटण पालखीतळ परिसरात कृषिकन्या वैष्णवी गायकवाड, प्रणिता चव्हाण यांनी वृक्षलागवड उपक्रम राबविला. या वेळी पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते. (छाया : सचिन गायकवाड)

सचिन गायकवाड, तरडगाव

Web Title: Tree planting in Palkhital area in Tardgaon!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.