कृषी कन्यामार्फत वृक्षारोपण....
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:24 AM2021-07-19T04:24:30+5:302021-07-19T04:24:30+5:30
कोपर्डे हवेली : निसर्गाचा समतोल राखण्यासाठी विविध घटकांच्या माध्यमातून वृक्षारोपण करण्यात येत असते. पार्ले येथे कृषी सप्ताहाचे औचित्य साधून ...
कोपर्डे हवेली : निसर्गाचा समतोल राखण्यासाठी विविध घटकांच्या माध्यमातून वृक्षारोपण करण्यात येत असते.
पार्ले येथे कृषी सप्ताहाचे औचित्य साधून जयवंतराव भोसले कृष्णा महाविद्यालयाची विद्यार्थिनी अंकिता नलवडे हिने ग्रामपंचायतीच्या प्रांगणात वृक्षारोपण केले.
यावेळी शेतकरी संघटनेचे नेते सचिन नलवडे, सरपंच अश्विनी मदने, उपसरपंच मोहन पवार, काँग्रेसचे सरचिटणीस अविनाश नलवडे, तंटामुक्ती अध्यक्ष संपतराव नलवडे, विकास सेवा सोसायटीचे संचालक संभाजी नलवडे, सचिव संभाजी नलवडे, बाळकृष्ण नलवडे, सूरज नलवडे, हेमंत पाटील, शशिकांत नलवडे, आदित्य नलवडे, नील नलवडे उपस्थित होते.
अंकिता नलवडे म्हणाली, ‘पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपाणाची जितकी गरज आहे, त्यापेक्षा जास्त वृक्षांचे संगोपन करण्याची गरज आहे. वृक्षारोपण करण्यासाठी चळवळ उभी राहिली पाहिजे, तर वृक्षारोपण होऊन त्यांचे संवर्धन होईल. कोरोनाच्या महामारीत प्राणवायू किती महत्त्वाचा आहे, ते लोकांना समजू लागले आहे. त्यासाठी प्रत्येकाने मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्याची गरज आहे.