सातारा ठोसेघर रस्त्यावर झाड उन्मळून पडले; दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प
By दीपक शिंदे | Updated: July 19, 2024 09:31 IST2024-07-19T09:30:58+5:302024-07-19T09:31:08+5:30
या मार्गावरून किल्ले सज्जनगड ठोसेघर चाळकेवाडी परळी खोरे परिसरातील वाहतूक सतत सुरू असते

सातारा ठोसेघर रस्त्यावर झाड उन्मळून पडले; दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प
सातारा - सातारा सज्जनगड रस्त्यावर बोगद्यातून बाहेर आल्यावर हॉटेल माउंटन व्यू नाजिक भले मोठे झाड पावसाने उन्मळून पडल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. सकाळी साडेसात ते आठच्या दरम्यान ही घटना घडली असून सध्या या ठिकाणी दोन्ही बाजूने वाहतूक ठप्प झाली आहे.
या मार्गावरून किल्ले सज्जनगड ठोसेघर चाळकेवाडी परळी खोरे परिसरातील वाहतूक सतत सुरू असते. सध्या परळी ठोसेघर खोऱ्यात पावसाची रिपीट सुरू असून रस्त्यावर अनेक ठिकाणी दगड माती वाहून येत आहे बोगदाचे डबेवाडी या नुकत्याच झालेल्या रस्त्यावरही ग्रीड मुळे दुचाकी वाहने सतत घसरत आहेत. सज्जनगड ठोसेघर चाळकेवाडी अलवडी या मार्गावर ही छोटी मोठी झाडे पडत आहेत.