झाडं तर लावली.. आता जाळीनं वाचवू या !
By admin | Published: July 23, 2016 11:22 PM2016-07-23T23:22:20+5:302016-07-23T23:51:01+5:30
गोलबाग मित्रमंडळ : काड्यांपासून बनविल्या संरक्षक जाळ्या
सातारा : जिल्ह्यातील दुष्काळ हद्दपार करण्याची भीष्मप्रतिज्ञा घेतलेल्या सातारकरांनी गेल्या उन्हाळ्यात भरभरून झाडे लावली. गावोगावच्या डोंगरावर बिया टोकल्या तर काहींनी रोपांची लागवड केली; पण उगवलेले झाडांचे संवर्धन करण्याचा निश्चय येथील गोलबाग मित्रमंडळाने केला आहे. त्यासाठी त्यांनी जाळ्याही तयार केल्या आहेत.
येथील गोलबाग मित्रमंडळाच्या वतीने बोगदा ते कुरणेश्वर परिसरात अजित भिलारे, रमेश मालुसरे व बाळासाहेब शिंदे यांच्या प्रयत्नातून जवळपास २०० वृक्षांची लागवड, करून त्यांच्या संवर्धनासाठी ‘ट्री गार्ड’ बसविण्यात आले आहेत.
अजित भिलारे म्हणाले, ‘भविष्याचा वेध घेता वृक्षारोपण करणे व ते जोपासने हे प्रत्येकाने जबाबदारी ओळखून काम करण्याची गरज आहे. तसेच लावलेल्या वृक्षांची योग्य काळजी घेऊन त्यांचे संवर्धन करणे ही काळाची गरज आहे.’
याप्रसंगी वड, पिंपळ, सप्तपर्णी, रामफळ, चिकू, पेरू, फणस अशा विविध रोपांची व बियांची लागण करण्यात आली.
याप्रसंगी गोलबाग मित्रमंडळाचे अध्यक्ष दीपक शिंदे, बिल्डर्स असोसिएशनचे नंदकुमार फडके, प्रशांत थोरात, दिनेश पवार, सुरेश बादापुरे, बाळासाहेब शिंदे, अनिल भोसले, प्रशांत थोरात, विनोद निकम, डॉ. भोसले, विजय जाधव, भाऊ माळी, अरविंद भिलारे, भास्कर पवार, आबा बेडेकर, संदीप थोरात, गणेश बागडे, रवींद्र भिलारे, सतीश ननवरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)
अनोखी शक्कल...
उगवलेली रोपे जनावरे खाऊन टाकतात. त्यामुळे सत्तर टक्के झाडे उगवतच नाही. यासाठी तारेपासून जाळी बसविली जाते. मात्र, या जाळ्या चोरीला जाण्याचे प्रमाण जास्त आहे. यावर मार्ग काढण्यासाठी गोलबाग मित्रमंडळाने काड्यांपासून जाळी तयार केली आहे. ही जाळी खड्ड्यांभोवती लावली आहे.