स्मशानभूमीत बहरणार वृक्षवेली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:33 AM2021-01-17T04:33:52+5:302021-01-17T04:33:52+5:30
जावेद खान लाेकमत न्यूज नेटवर्क सातारा : स्मशानभूमी म्हटलं तर कायम दुर्लक्षित राहणारी बाब. कोणी तरी दगावले तर तेथे ...
जावेद खान
लाेकमत न्यूज नेटवर्क
सातारा : स्मशानभूमी म्हटलं तर कायम दुर्लक्षित राहणारी बाब. कोणी तरी दगावले तर तेथे जाणे होते. मात्र, साताऱ्यातील सदर बाजार येथील कब्रस्तानमध्ये वृक्षारोपण केले आहे. या ठिकाणची ओसाड पडलेली स्मशानभूमी आता झाडांनी बहरली आहे. सदर बाजारातील माजी सैनिक सलीम मेमन यांनी स्वतःबरोबर इतरांच्या मदतीने या ठिकाणी पाचशेहून अधिक झाडे लावून ती जगवली आहेत.
१. येथे ‘एक कबर, एक झाड’ ही संकल्पना राबविण्यात येत असून, प्रत्येक कबरीजवळ एक झाड लावण्याचा प्रयत्न आहे. ते जगविण्यासाठी, त्यांची देखभाल रहीम सलीम मेमन स्वत: करत आहेत.
२. कब्रस्तानमध्ये मुरमाड माती असल्याने झाडांना कायम ओलावा मिळावा, यासाठी ठिंबक सिंचनच्या मदतीने या ठिकाणी प्रत्येक झाडाच्या बुंदक्याला पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे कमी पाण्यात झाडे जगणार आहेत.
३. ही स्मशानभूमी पाच-सहा वर्षांपूर्वी झाडाझुडपात दिसून येत नव्हती. त्यामुळे या ठिकाणी संपूर्ण झुडपे, गवत काढून फुलझाडे व फळझाडे लावण्यात आली आहेत. या झाडांची आता चांगली वाढ होत आहे.