खंडाळ्यात तिरंगी लढतीचे चित्र

By admin | Published: November 3, 2016 12:15 AM2016-11-03T00:15:48+5:302016-11-03T00:15:48+5:30

निवडणूक : ४५ अर्ज अवैध; कोण-कोण तलवार मान्य करणार; ११ तारखेनंतर स्पष्ट

Tri-color picture in Khandh | खंडाळ्यात तिरंगी लढतीचे चित्र

खंडाळ्यात तिरंगी लढतीचे चित्र

Next

खंडाळा : खंडाळा नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी बुधवारी अर्ज छाननी दिवशीच निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. सर्वच पक्षांचा वतीने एका प्रभागात एकच अर्ज वैध धरल्याने इतर उमेदवारांचे अर्ज आपोआपच अवैध ठरविण्यात आले. त्यामुळे प्रत्येक प्रभागात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपा-शिवसेना यांच्यातर्फे एक उमेदवार निश्चित झाला आहे. त्यामुळे खंडाळ्याची निवडणूक तिरंगी होणार हे स्पष्ट असून, केवळ चारच अपक्षांचे अर्ज वैध राहिले आहेत. त्यामुळे लगेचच प्रमुख पक्षांच्या वतीने बैठका घेऊन निवडणुकीची यंत्रणा कशी असावी याबाबत विचारविनिमय करण्यात आला.
खंडाळ्यातील १७ प्रभागांसाठी अधिकृत उमेदवार म्हणून काँग्रेसचे १७ उमेदवार तर भाजपा-शिवसेनेचे १७ उमेदवार तसेच अपक्ष ४ उमेदवार रिंगणात असल्याचे स्पष्ट झाले आहे. यापैकी माघारीच्या अखेरपर्यंत कोण-कोण अपक्ष आपली तलवार म्यान करणार यावर पुढील रणनीती स्पष्ट होईल.
खंडाळा नगरपंचायतीसाठी १०४ अर्ज दाखल झाले होते. यापैकी ४५ अर्ज पक्षाच्या वतीने भरलेले ए. बी. फॉर्म नसल्याने बाद ठरविण्यात आले. ज्या उमेदवारांना पक्षाचा अधिकृत फॉर्म प्रथम क्रमांकाने दिले गेले होते. त्यांचेच अर्ज वैध धरण्यात आले. त्यामुळे निवडणुकीचे चित्र बुधवारीच स्पष्ट झाले आहे.
काही प्रभागांमधून दिग्गज रणांगणात आपले कसब पणाला लावणार आहेत. लक्षवेधी असलेल्या प्रभाग १४ मधून पंचायत समितीचे सदस्य अनिरुद्ध गाढवे
यांच्याशी राष्ट्रवादीचे औद्योगिक सेलचे अध्यक्ष शैलेश गाढवे लढत देणार आहेत तर प्रभाग १ मधून राष्ट्रवादीचे दयानंद खंडागळे यांचा सामना काँग्रेसचे शहरप्रमुख सचिन खंडागळे करणार आहेत. प्रभाग ९ मधून राष्ट्रवादीचे अशोक गाढवे यांच्याशी काँग्रेसचे दत्तात्रय गाढवे मुकाबला करतील. प्रभाग १० मधून काँग्रेसचे माजी सरपंच प्रल्हाद खंडागळे यांच्याशी राष्ट्रवादीचे बाबासाहेब गाढवे लढत देतील येथे भाजपाचे अभिजित खंडागळे हे देखील नशीब आजमावणार आहेत तर सेनेचे शहरप्रमुख मंगेश खंडागळे हे सुद्धा रिंगणात असल्याने येथे लक्षवेधी ठरणार आहे. प्रभाग १३ मधून राष्ट्रवादीचे शहरप्रमुख प्रशांत देशमुख यांच्यासमोर काँग्रेसचे युवक अध्यक्ष युवराज गाढवे यांचे आव्हान असणार आहे.
त्याचबरोबर नगराध्यक्षपदाच्या प्रभागात प्रभाग १७ मध्ये राष्ट्रवादीचे शरद दोशी व काँग्रेसचे माजी ग्रामपंचायत सदस्य संतोष बावकर यांच्यात जोरदार लढत होणार आहे. भाजपाचे बापूराव बरकडे हे
देखील आव्हान निर्माण करतील. प्रभाग १२ मधून राष्ट्रवादीचे माजी उपसरपंच जावेद पठाण यांच्याविरोधात काँग्रेसचे साजिद मुल्ला उभे ठाकणार आहेत.
या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या रंगतदार लढतीत भाजप-शिवसेनेने उडी घेतल्याने आत तिरंगी लढत स्पष्ट झाली आहे. मोजक्याच ठिकाणी अपक्ष डोके वर काढण्याची चिन्हे असल्याने त्यावरही पक्षीय प्रमुखांचे लक्ष दिले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Tri-color picture in Khandh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.