टेंभु योजनेच्या पाण्यासाठी ग्रामस्थांचे सोमवारी एल्गार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2019 06:48 PM2019-06-08T18:48:25+5:302019-06-08T18:49:45+5:30
कायमस्वरूपी दुष्काळी असणाऱ्या माण व खटाव तालुक्यातील काही गावे कोणत्याही पाणी योजनेत समाविष्ट झाली नाहीत. शेतीच्या व पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकणाºया गावांनी सोमवारी दि. १० रोजी खटाव तालुक्यातील
म्हसवड : कायमस्वरूपी दुष्काळी असणाऱ्या माण व खटाव तालुक्यातील काही गावे कोणत्याही पाणी योजनेत समाविष्ट झाली नाहीत. शेतीच्या व पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकणाºया गावांनी सोमवारी दि. १० रोजी खटाव तालुक्यातील विखळे येथे एल्गार परिषदेचे आयोजन केल्याची माहिती संयोजकांनी दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की कायमस्वरूपी दुष्काळी असणाºया माण व खटाव तालुक्यासाठी १९९५ साली राज्यातील युतीच्या शासनाने कृष्णा खोरे विकास महामंडळाची स्थापना के ले. त्यामध्ये उरमोडी, जिहे कटापूर व तर टेंभू उपसा जलसिंचन योजनेचा समावेश करण्यात आला होता. त्यामध्ये उरमोडी योजनेतून माण तालुक्यातील कुकुडवाड व खटाव तालुक्यातील पूर्वेकडे असणारी विखळे, कलेढोण, कणकत्रे, ढोकळवाडी, हिवरवाडी, तरसवाडी, औतरवाडी व माण तालुक्यातील कुकुडवाड, पुकलेवाडी, मानेवाडी, मस्करवाडी, आगासवादी, धनवडेवाडी, भाकरेवाडी, व विरळी परिसराचा समावेश नाही. या गावांना टेंभू योजनेतून पाणी मिळणे शक्य आहे. इतर कोणत्याही योजनेतून या गावांना पाणी मिळणार नाही अशी परिस्थिती सद्या आहे. माण व खटाव तालुक्यातील वंचित गावांना टेंभू योजनेतून पाणी मिळाले नाही. त्यामुळे या गावातील नागरिक धास्तावले आहेत.
गावांना पाणी द्या
त्यामुळे या वंचित गावांना टेंभू योजनेतून पाणी मिळाले पाहिजे अशी मागणी या सर्व गावातील नागरिकांनी केली आहे. त्यामुळे तेथील लोकांचा शेती व पिण्याच्या प्रश्न मिटणार असे चित्र दिसत आहे.