लोणंदजवळ ट्रकचा भीषण अपघात; दोन जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2018 14:27 IST2018-10-07T14:26:06+5:302018-10-07T14:27:49+5:30
लोणंद-निरा रोडवर दोन ट्रकच्या समोरासमोर झालेल्या धडकेत दोन्ही ट्रकमधील चालकांचा जागीच मृत्यू झाला, तर दोन जण जखमी आहेत.

लोणंदजवळ ट्रकचा भीषण अपघात; दोन जणांचा मृत्यू
लोणंद (सातारा) : लोणंद-निरा रोडवर दोन ट्रकच्या समोरासमोर झालेल्या धडकेत दोन्ही ट्रकमधील चालकांचा जागीच मृत्यू झाला, तर दोन जण जखमी आहेत. हा अपघात रविवारी पहाटे 6.15 वाजण्याच्या सुमारास झाला. आरिफ आसिफ खान (वय २१ वर्ष), गोविंद लक्ष्मण वाल्हेकर (वय ३७ वर्ष) असे मृत्युमुखी पडलेल्यांची नावं आहेत, तर रफिक खान, शाहरूख खान हे दोघे जण जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, लोणंद निरा मार्गावर लोणंदकडे निघालेला बारा चाकी ट्रकने समोरुन येणा-या ट्रकला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की दोन्ही ट्रकच्या समोरील भागाचा चेंदामेंदा झाला. यामध्ये दोन्ही ट्रकच्या चालकांचा जागीच मृत्यू झाला. मृतदेह बाहेर काढण्यासाठी व ट्रक वेगळे करण्यासाठी दोन क्रेनच्या सहाय्यानं एक तास पोलीस यंत्रणा कसोशीने प्रयत्न करत होते. जखमींना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.