लोणंद येथे दारू बाटल्यांसह चालकाने ट्रक
By admin | Published: December 7, 2015 12:16 AM2015-12-07T00:16:05+5:302015-12-07T00:17:25+5:30
पळविला--५८ लाखांचा ऐवज लंपास
लोणंद : लोणंद औद्योगिक वसाहतीत विदेशी दारू बनविणाऱ्या एका कंपनीतून माल वाहतुकीसाठी आलेल्या
ट्रकचालकाने ९५० दारूचे बॉक्स असलेला ट्रकच पळविला. सुमारे ५८ लाख ८० हजारांचा ऐवज लंपास केल्याप्रकरणी ट्रकचालकाविरोधात लोणंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दत्तात्रय नरुटे (रा. मदनवाडी, ता. इंदापूर, जि. पुणे) असे ट्रकचालकाचे नाव आहे. लोणंद पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नीरा (ता. पुरंदर) येथून माल वाहतुकीसाठी बुधवारी (दि. २) सायंकाळी एका कंपनीत पंडित भगवान काळे यांच्या मालकीचा ट्रक (एमएच २५ यू १०२२) चालक दत्तात्रय नरुटे हा एका कंपनीत ट्रक घेऊन गेला. दारूचे बॉक्स त्याला कोल्हापूर येथील एका दुकानात पोहोचवायचे होते. ट्रकमध्ये दारूचे बॉक्सभरल्यानंतर तो तेथून निघून कोल्हापूरकडे रवाना झाला. मात्र, दोन दिवस झाले तरी त्या ठिकाणी पोहोचला नसल्याचे ट्रकमालकाच्या निदर्शनास आहे. त्यानंतर त्यांनी लोणंद पोलीस ठाण्यात धाव घेऊन चालकाविरुद्ध तक्रार नोंदविली. सहायक पोलीस निरीक्षक संदीप भोसले या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत. (वार्ताहर)