आदर्की गावच्या हद्दीत ट्रक पलटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:26 AM2021-07-02T04:26:52+5:302021-07-02T04:26:52+5:30

आदर्की : फलटण-सातारा रस्त्यावर आदर्की बुद्रुक गावच्या हद्दीत भुसा भरलेला ट्रक तीव्र वळणावर पलटी झाल्याने चार जण किरकोळ जखमी ...

Truck overturns at Adarki village boundary | आदर्की गावच्या हद्दीत ट्रक पलटी

आदर्की गावच्या हद्दीत ट्रक पलटी

Next

आदर्की : फलटण-सातारा रस्त्यावर आदर्की बुद्रुक गावच्या हद्दीत भुसा भरलेला ट्रक तीव्र वळणावर पलटी झाल्याने चार जण किरकोळ जखमी झाले. या अपघातामुळे दिवसभर एकेरी वाहतूक सुरु होती.

फलटण-सातारा रस्त्यावर आदर्की बुद्रुक गावच्या हद्दीत बामणकडा नावाच्या शिवारात तीव्र उतारावर सकाळी सातच्या सुमारास दरम्यान मध्यप्रदेश येथून भुसा भरून कोल्हापूरकडे जाणारा ट्रक (एमएच १८ बीजी ७२८) हा पलटी झाला. त्यामध्ये युसूफ बफ (वय ४७), राहुल बडोले (२८), रवींद्र बामणीया (२५), संतोष कर्मा (२६) हे अडकून पडले होते. गावचे पोलीस पाटील दीपक भिंगारे, युनूस पठाण, प्रदीप धुमाळ यांनी तातडीने बाहेर काढून तिघांवर प्रथम उपचार करून, संतोष कर्मा याला जास्त मार लागल्याने त्याला सातारा येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. ट्रक तीव्र वळणावर पलटी झाल्याने दिवस एकेरी वाहतूक सुरू होती. तर अपघातग्रस्त ट्रकमधून दुसऱ्या ट्रकमध्ये भुसा भरण्याचे काम सुरू होते.

फोटो -आदर्की बुद्रुक ता. फलटण गावच्या हद्दीत भुसा भरून निघालेल्या ट्रक पलटी झाला. (छाया: सूर्यकांत निंबाळकर)

Web Title: Truck overturns at Adarki village boundary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.