सावकाराच्या त्रासाला कंटाळून व्यावसायिकाचा आत्महत्येचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2018 11:53 PM2018-10-03T23:53:44+5:302018-10-03T23:53:49+5:30

Trying to succumb to a succession tragedy | सावकाराच्या त्रासाला कंटाळून व्यावसायिकाचा आत्महत्येचा प्रयत्न

सावकाराच्या त्रासाला कंटाळून व्यावसायिकाचा आत्महत्येचा प्रयत्न

Next

कºहाड : खासगी सावकाराच्या त्रासाला कंटाळून गॅरेज व्यावसायिकाने औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. संबंधितावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून, याप्रकरणी सावकारावर कºहाड शहर पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
अब्दुल दस्तगीर मुजावर (वय ३६, रा. व्यंकटेश प्लाझा, मलकापूर) असे आत्महत्येचा प्रयत्न केलेल्याचे नाव आहे. तर आसिफ मुलाणी (रा. मुजावर कॉलनी, कºहाड) या सावकारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मलकापूर येथील व्यंकटेश प्लाझामध्ये अब्दुल मुजावर हा वास्तव्यास आहे. त्याच्यासह वडील, भाऊ हे गॅरेज चालवतात. जुन्या कार खरेदी-विक्रीचा व्यवसायही अब्दुल करतो. दोन वर्षांपूर्वी त्याची मुजावर कॉलनी येथील आसिफ मुलाणी याच्याशी ओळख झाली. ओळखीतून २०१७ मध्ये अब्दुल मुजावर याने मुलाणी याच्याकडून एक लाख रुपये व्याजाने घेतले. मुलाणी याने त्यावेळी कोऱ्या स्टॅम्पवर अब्दुल मुजावर याच्या सह्या घेतल्या. त्यानंतर जानेवारी २०१८ मध्ये अब्दुलने मुलाणीला ७० हजार रुपये दिले. मात्र त्याने ७० हजार रुपये व्याजात जमा केले, असे म्हणून पुन्हा अब्दुलकडे एक लाख रुपयांची मागणी केली. पैशांसाठी वारंवार फोन करून धमक्या दिल्या. त्याच्या तगाद्याला कंटाळून अब्दुलने कºहाड सोडून बेळगावात कार चालवली. तेथे पाहुण्यांकडून व कार चालवून ४० हजार रुपये एका महिन्यात जमवले. ते पैसे घेऊन अब्दुल मलकापुरात आला. ४० हजार रुपये त्याने मुलाणीला दिले. मात्र, तरीही मुलाणी प्रत्यक्ष भेटून व फोनवरून पुन्हा एक लाख रुपयांसाठी धमक्या देत होता.त्याच्या धमक्यांमुळे टेन्शन आल्याने अब्दुलने १ आॅक्टोबर रोजी घरात तापावरच्या व पित्तावरच्या चार गोळ्या, दोन औषधाच्या बाटल्या एकदम पिल्या. एकदम औषधे पिल्याने त्याला चक्कर आली. कुटुंबीयांनी त्याला वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांनी अब्दुलची विचारपूस करून खासगी सावकारी कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार आसिफ मुलाणी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Trying to succumb to a succession tragedy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.