..अन् ट्रॅक्टर घुसला थेट घरात, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली; साताऱ्यातील विडणीजवळ झाला अपघात

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2022 12:51 PM2022-11-23T12:51:20+5:302022-11-23T12:51:37+5:30

आळंदी-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावर फलटण तालुक्यातील विडणी येथील अब्दागिरेवाडी जवळ आज, बुधवारी सकाळच्या सुमारास हा अपघात झाला.

Trying to avoid a head-on collision between two tractors the tractor rammed into the house near Vidni in Satara | ..अन् ट्रॅक्टर घुसला थेट घरात, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली; साताऱ्यातील विडणीजवळ झाला अपघात

..अन् ट्रॅक्टर घुसला थेट घरात, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली; साताऱ्यातील विडणीजवळ झाला अपघात

googlenewsNext

सतिश कर्वे

कोळकी : दोन ट्रॅक्टरची समोरा-समोर होणारी धडक चुकवण्याच्या प्रयत्नात महामार्गालगत असलेल्या घरातच एक ट्रॅक्टर भिंत तोडून घुसला. या अपघातात ट्रॅक्टर चालक गंभीर जखमी झाला. सुदैवाने घरातील लोक घराबाहेर असल्याने मोठी दुर्घटना टळली. आळंदी-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावर फलटण तालुक्यातील विडणी येथील अब्दागिरेवाडी जवळ आज, बुधवारी सकाळच्या सुमारास हा अपघात झाला.

याबाबत घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी की, फलटणहून पिंपरदकडे एक ऊस वाहतूक करणारा मोकळा ट्रॅक्टर निघाला होता. तर माळशिरसहून फलटणकडे खत वाहतूक करणारा मोकळा ट्रॅक्टर (एम.एच-१३-ए.जे.-५३२४) भरधाव वेगात निघाला होता. विडणी हद्दीतील अब्दागिरेवाडीजवळ या दोन ट्रॅक्टरची समोरा समोर धडक होत होती.

ही धडक चुकवण्याच्या प्रयत्नात चालकाचे ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटल्याने महामार्गालगत असलेल्या घरात एक ट्रॅक्टर घुसला. यात चालक गंभीर जखमी झाला. तर ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकाने घटनास्थळावरुन पलायन केले. अपघातानंतर नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमी ट्रक चालकास शासकीय रुग्णालयात उपचारासाठी पाठविले.

अपघाताची माहिती विडणीच्या पोलिस पाटील शितल नेरकर यांनी फलटण ग्रामीण पोलिसांना दिली. यानंतर तत्काळ फलटण ग्रामीणचे पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिस पुढील तपास करीत आहेत.

Web Title: Trying to avoid a head-on collision between two tractors the tractor rammed into the house near Vidni in Satara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.