शिवथर परिसरात हळद काढण्याची लगबग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:34 AM2021-01-22T04:34:48+5:302021-01-22T04:34:48+5:30
शिवथर : शिवथर व परिसरात हळद काढण्यासाठी शेतकऱ्यांची गडबड सुरू झाली आहे. संक्रांतीच्या मुहूर्तावर या भागातील शेतकरी पाला कापणे ...
शिवथर : शिवथर व परिसरात हळद काढण्यासाठी शेतकऱ्यांची गडबड सुरू झाली आहे. संक्रांतीच्या मुहूर्तावर या भागातील शेतकरी पाला कापणे तसेच हळद खांदणी यासारख्या हळदीच्या कामाला सुरुवात करत असतात.
शिवथर, आरफळ, मालगाव, गोवे या भागांत बागायती क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे. मुबलक पाणी व शेणखत उपलब्ध असल्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणावर मेच्या शेवटच्या आठवड्यात ते जूनच्या पहिल्या आठवड्याच्या दरम्यान हळदीची लागवड केली जाते. नऊ महिन्यांनंतर संक्रांतीच्या मुहूर्तावर हळद काढण्याची सुरुवात केली जाते.
एकरी सरासरी १० ते १२ क्विंटलचा उतारा येत असल्याने शेतकरी समाधानी आहे. सध्या शिवारामध्ये सगळीकडे हळदीचे ढीग दिसून येत आहे. मजुरांची वानवा असली तरी या भागात मजुरांच्या टोळ्या उपलब्ध आहेत. हळद काढणीस मजूर एकरी पंधरा हजार एवढी मजुरी घेत असून, हळद लागणीपासून काढणीपर्यंत व बाजारात विक्रीसाठी जाईपर्यंत मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्याला खर्च येत आहे.
चौकट...
पावसामुळे हळदीचे उत्पन्न घटले...
यावर्षी पडलेल्या अवेळी पावसामुळेसुद्धा हळदीचे उत्पन्न घटले आहे. हळदीचे उत्पन्न समाधानकारक असले, तरी सध्याचा असलेला भाव जर असाच राहिला, तर शेतकऱ्यांनी केलेला खतपाणी, मजुरी व औषधांचा खर्चसुद्धा मिळणे अवघड आहे.
फोटो आहे..
२१शिवथर
शिवथर व परिसरात हळद काढण्यासाठी शेतकऱ्यांची गडबड सुरू झाली आहे.