‘पुस्तकांचे हळदी-कुंकू ’ कार्यक्रमातून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:40 AM2021-02-16T04:40:44+5:302021-02-16T04:40:44+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : ‘आम्ही लेखिका’ या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या सातारा जिल्हा समूहाच्यावतीने ‘पुस्तकांचे हळदी-कुंकू’ हा आगळावेगळा कार्यक्रम झाला. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : ‘आम्ही लेखिका’ या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या सातारा जिल्हा समूहाच्यावतीने ‘पुस्तकांचे हळदी-कुंकू’ हा आगळावेगळा कार्यक्रम झाला. यानिमित्ताने वाचन संस्कृतीला बळ देण्यासाठी एक सकारात्मक पाऊलही उचलण्यात आले.
साताऱ्यातील दीपलक्ष्मी हॉलमध्ये हा कार्यक्रम झाला. धार्मिक परंपरांना फाटा देत ‘आम्ही लेखिका’च्या शब्दसखींनी एकत्र येत पुस्तकांचे हळदी कुंकू साजरे केले. तर यामध्ये तिळगुळ, साहित्यिक गप्पागोष्टी तसेच प्रत्येकीने किमान एक पुस्तक जमा करून ते का वाचावे याबद्दल बोलायचे, असे या कार्यक्रमाचे स्वरूप होते.
स्मार्टफोनच्या जमान्यात पुस्तक वाचन कमी होताना दिसत आहे. अशातच ते विकत घेऊन वाचणे तर आणखी दूरची गोष्ट. म्हणून वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देणारे असे कार्यक्रम सतत व्हायला हवेत, असे मतही यावेळी ‘आम्ही लेखिका’च्या सदस्यांनी मांडले.
या कार्यक्रमात मार्गदर्शिका अॅड. सीमंतिनी नुलकर, अध्यक्षा शुभांगी दळवी, उपाध्यक्षा कल्याणी थत्ते, सचिव अॅड. डॉ. सुचित्रा घोगरे-काटकर, कोषाध्यक्षा सविता कारंजकर, कार्यवाह अॅड. जान्हवी जोशी, निमंत्रक डॉ. संजीवनी पिंगळे, संचालक अॅड. संगीता केंजळे, आराधना गुरव, शुभांगी कुंभार, संगीता गुरव, डॉ. नलिनी महाडिक यांच्यासह सातारा जिल्ह्यातील अनेक शब्दसखी सहभागी झाल्या होत्या.
फोटो दि. १४सातारा आम्ही लेखिका फोटो...
फोटो ओळ : सातारा येथे आम्ही लेखिका संस्थेच्या ‘पुस्तकांचे हळदी-कुंकू’ कार्यक्रमात मोठा सहभाग दिसून आला.
..............................................................