नांदणी पुलाजवळील वळण धोकादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:42 AM2021-09-27T04:42:02+5:302021-09-27T04:42:02+5:30
पुसेसावळी : विटा-महाबळेश्वर या राज्य मार्गावरील नांदणी पुलाजवळील वळण अतिशय धोकादायक असल्याने वारंवार या ठिकाणी अपघात होत आहेत. तरी ...
पुसेसावळी : विटा-महाबळेश्वर या राज्य मार्गावरील नांदणी पुलाजवळील वळण अतिशय धोकादायक असल्याने वारंवार या ठिकाणी अपघात होत आहेत. तरी याबाबतची उपाययोजना संबंधित विभागाने करणे गरजेचे असल्याचे वाहनचालकांकडून बोलले जात आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, वडगाव-पुसेसावळी मार्गावरील नांदणी नदीजवळच्या वळणामुळे वाहनचालकांचा वाहनावरील ताबा सुटून वाहन लोखंडी अँगलला धडक देऊन नाल्यामध्ये पलटी होत आहेत. त्यामुळे वाहनचालक जखमी होऊन गाडीचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे.
या रस्त्यावर वाहने वेगाने धावत आहेत. त्यामुळे अचानक येणाऱ्या वळणामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. या नांदणी नदीजवळील वळणे पूर्वीपासूनच अत्यंत धोकादायक स्थितीत होती. तरी रुंदीकरणानंतरही जैसे थे परिस्थिती आहेत. तरी रस्त्याच्या रुंदीकरणावेळी संबंधितांनी या प्रश्नाकडे गांभीर्याने न पाहिल्याने या वळणाच्या ठिकाणी सतत अपघात होत आहेत. वेग नियंत्रणासाठी वाहनचालकांतून या वळणाच्या दोन्ही बाजूला झेब्रा क्रॉसिंग करणे गरजेचे आहे. तरच अपघातावर नियंत्रण मिळविता येईल. मात्र, बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे अनेक वाहनचालकांचे अपघात झाले आहेत. तरी या वळणाबाबत प्रवासी वर्ग व ग्रामस्थांतून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
(चौकट)
उपाययोजनेची गरज...
नांदणी पुलाजवळची धोकादायक वळणे संबंधित विभागाने पुन्हा सर्वेक्षण करून काढण्याची आवश्यकता आहे. तरच या ठिकाणी अपघात होणार नाहीत. अन्यथा अनेकांना या वळणामुळे मोठ्या अपघाताची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे संबंधित विभागागने याकडे लक्ष देऊन यावर तातडीने नियोजन करावे, अशी मागणी प्रवाशांसह नागरिकांमधून होत आहे.
फोटो: