पालखी तळावर बारा सीसीटीव्ही कॅमेरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2015 12:23 AM2015-07-14T00:23:15+5:302015-07-14T00:23:15+5:30

लोणंद : पोलीस बंदोबस्त तैनात

Twelve CCTV Cameras at Palkhi | पालखी तळावर बारा सीसीटीव्ही कॅमेरे

पालखी तळावर बारा सीसीटीव्ही कॅमेरे

Next

लोणंद : श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे अनुषंगाने संपूर्ण सातारा जिल्ह्यातील उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, पोलीस जवान असे एकूण ६५० पोलीस अधिकारी व कर्मचारी व २५० होमगार्ड असा पोलीस बंदोबस्त पालखी सोहळ्यासाठी लोणंद येथे तैनात करण्यात आला असून पालखी तळावर १२ सीसीटीव्ही कॅमरे लावण्यात आले आहेत. अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश चोपडे व सहायक पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांनी दिली.
पालखी आगमन व मुक्कामाचे ठिकाणी व पालखी सोहळ्यामध्ये गर्दीचे ठिकाणी गुन्हेगार व समाजकंटकावर नजर ठेवण्याकरिता व महिलांची छेडछाड व चोरांवर नियंत्रण ठेवण्यासाठी १२ खासगी व सरकारी सीसीटीव्ही कॅमेरे ठिकठिकाणी लावण्यात आले आहेत.तसेच खासगी वेशात ५० पोलीस जवान तैनात करण्यात आले आहेत. व पालखी तळावर वॉच टॉवर लावण्यात आले आहेत. दिवसपाळी व रात्रपाळीकरिता आरसीपी व क्यूटीचे पथक नेमण्यात आले आहेत.
लोकांमध्ये जनजागरण करण्यासाठी संशयास्पद बेवारस वस्तू, बॅगा आढळून आल्यास संबंधितांनी तत्काळ पोलिसांच्या निदर्शनास आणून द्यावे. या करीता पालखीतळ परिसरात ठिकठिकाणी फ्लेक्स बोर्ड व जाहिरात पत्रिका लावण्यात व वाटणेत आल्या आहेत. याव्यतीरिक्त बारा वाहने पेट्रोलिंगसाठी नेमणेत आली आहेत. बसस्थानक रेल्वे स्टेशन येथे ठिकठिकाणी कॅमेरे बसवण्यात आले आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली. (वार्ताहर)

 

Web Title: Twelve CCTV Cameras at Palkhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.