रहीमतपुरात थकबाकीदारांचे बारा गाळे सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:39 AM2021-03-20T04:39:46+5:302021-03-20T04:39:46+5:30

रहीमतपूर : कोरेगाव तालुक्यातील रहीमतपूर नगरपालिकेच्या वसुली पथकाने घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीसाठी बारा थकबाकीदारांच्या व्यावसायिक गाळ्यांना सील ठोकले आहे, ...

Twelve seals of arrears in Rahimatpur | रहीमतपुरात थकबाकीदारांचे बारा गाळे सील

रहीमतपुरात थकबाकीदारांचे बारा गाळे सील

Next

रहीमतपूर : कोरेगाव तालुक्यातील रहीमतपूर नगरपालिकेच्या वसुली पथकाने घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीसाठी बारा थकबाकीदारांच्या व्यावसायिक गाळ्यांना सील ठोकले आहे, तर पंधरा नळ कनेक्शन तोडले आहेत. या माध्यमातून वसुलीसाठी कारवाईचा धडाका सुरू केला आहे.

रहीमतपूरच्या विकासासाठी घरपट्टी व पाणीपट्टी तातडीने जमा करावी, असे आवाहन पालिका प्रशासनाच्या वतीने वारंवार नागरिकांना करण्यात आले. तरीही अपेक्षप्रमाणे वसुली न झाल्याने नाइलाजाने पालिका प्रशासनाने कारवाईची धडक मोहीम हाती घेतली. गेल्या आठ दिवसांत घरपट्टी भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या बारा थकबाकीदार व्यावसायिकांच्या गाळ्यांना सील ठोकण्यात आले आहे. या गाळेधारकांच्याकडून तब्बल ३ लाख ४८ हजार रुपये येणे बाकी आहे, तर घरपट्टी व पाणीपट्टी न भरणाऱ्या पंधरा थकबाकीदारांचे नळकनेक्शन तोडण्यात आले आहे. या मिळकतदारांकडून सुमारे ऐंशी हजार रुपये थकबाकी येणे आहे. या कारवाईच्या भीतीने अनेक थकबाकीदारांची घरपट्टी व पाणीपट्टी भरण्यासाठी पालिकेत वर्दळ वाढली आहे. तरीही अद्याप पन्नास टक्केच वसुली झाली आहे. मार्च महिना संपण्यासाठी अद्याप अकरा दिवसांचा अवधी बाकी आहे. या काळात जास्तीत जास्त घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीसाठी पालिकेचे वसुली पथक आक्रमक झाले आहे. कारवाई करणाऱ्या वसुली पथकामध्ये विजय चव्हाण, धीरज बर्गे, किशोर कुदळे, निसार मुल्ला आदी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

(चौकट )

घरपट्टी व पाणीपट्टी जमा करा

रहीमतपुरातील मिळकतदाराकडून घरपट्टी व पाणीपट्टी वसुली करण्यासाठी रिक्षाच्या माध्यमातून गल्लोगल्ली आवाहन केले जात आहे. नागरिकांनी तात्काळ घरपट्टी व पाणीपट्टी जमा करून पालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्ष आनंदा कोरे यांनी केले आहे.

* फोटो : रहीमतपूर, ता. कोरेगाव येथील थकबाकीदारांचे व्यावसायिक गाळे पालिकेच्या वसुली पथकाने सील केले आहेत.

(छाया : जयदीप जाधव)

Web Title: Twelve seals of arrears in Rahimatpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.