धक्कादायक: मंदिरातच बारा वर्षाच्या मुलीवर अत्याचार, लोणंद पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2022 03:31 PM2022-03-02T15:31:45+5:302022-03-02T16:45:50+5:30

संशयित आरोपी तरुणाच्या वडिलानेही मुलीला ‘तू माझ्या मुलासोबत लग्न कर, अन्यथा तुझ्या वडिलांना व तुझ्या घरातील लोकांना मारून टाकीन,’ अशी धमकी दिली.

Twelve year old girl was tortured in the temple itself, a case was registered against her at Lonand police station satara | धक्कादायक: मंदिरातच बारा वर्षाच्या मुलीवर अत्याचार, लोणंद पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल

धक्कादायक: मंदिरातच बारा वर्षाच्या मुलीवर अत्याचार, लोणंद पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल

googlenewsNext

सातारा : एका मंदिरातच बारा वर्षाच्या मुलीवर तरुणाने अत्याचार केल्याची खळबळजनक घटना खंडाळा तालुक्यातील एका गावात उघडकीस आली असून, ही घटना दोन महिन्यांपूर्वी घडली आहे. याप्रकरणी लोणंद पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत लोणंद पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, खंडाळा तालुक्यातील एका गावातील बारा वर्षांची मुलगी ९ जानेवारी रोजी दुपारी दोन वाजता दुकानात जात होती. त्यावेळी त्याच गावातील एका तरुणाने तिला बोलावून घेतले. मुलीला धमकी देऊन जवळच असलेल्या मंदिरात नेले. त्यानंतर तिच्यावर त्याने जबरदस्तीने अत्याचार केला. ही गोष्ट कोणाला सांगितली तर तुला मारून टाकीन. तसेच तुझ्या घरच्यांना पण मारून टाकीन, अशी धमकी त्या तरुणाने दिली. त्यामुळे पीडित मुलीने हा प्रकार भीतीपोटी कोणालाही सांगितला नाही.

ही घटना घडली त्याच दिवशी संशयित आरोपी तरुणाच्या वडिलानेही मुलीला ‘तू माझ्या मुलासोबत लग्न कर, अन्यथा तुझ्या वडिलांना व तुझ्या घरातील लोकांना मारून टाकीन,’ अशी धमकी दिली. काही दिवसांपूर्वी पीडित मुलगी तिच्या मामीकडे गेली होती. त्यावेळी तिने हा सारा प्रकार मामीला सांगितला.
त्यानंतर मामीने फोनवरून मुलीच्या आईला या प्रकाराची माहिती दिली. मुलीच्या आईने तातडीने लोणंद पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.

पोलिसांनी संबंधित तरुणावर अत्याचार केल्याचा तर त्याच्या वडिलांवर धमकी दिल्याचा गुन्हा दाखल केला. दोघेही बापलेक पोलिसांना सापडले नसून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. पोलीस उपनिरीक्षक गणेश माने हे अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Twelve year old girl was tortured in the temple itself, a case was registered against her at Lonand police station satara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.