सव्वा लाख औषधी वनस्पतींची लागवड

By Admin | Published: July 25, 2016 10:44 PM2016-07-25T22:44:00+5:302016-07-25T23:35:31+5:30

पाटण वनविभागाचा उपक्रम : वणवा रोखण्यासाठी विद्यार्थी राबविणार जनजागृती...

Twenty-five hundred herbal medicinal plants | सव्वा लाख औषधी वनस्पतींची लागवड

सव्वा लाख औषधी वनस्पतींची लागवड

googlenewsNext

पाटण : तालुक्यातील पाचगणी, जाळगेवाडी, डेरवण, वेखंडवाडी, खराडवाडी या गावांच्या वनक्षेत्रातील ११६ हेक्टर जमिनीवर या पावसाळ्याच्या हंगामात १ लाख २५ हजार औषधी वनस्पतींची लागवड करण्यात आली आहे.
पाटण तालुका दुर्गम व डोंगराळ असला तरी दरवर्षी लागणारे वणवे, वृक्षतोड यामुळे वनक्षेत्र कमी होत चालले आहे. यावर उपाययोजना म्हणून पाटण वनविभागाच्या वतीने वनक्षेत्रातील जमिनीवर औषधी वनस्पतींची लागवड करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार यावर्षी पाचगणी येथील १६ हेक्टर जमिनीवर १६ हजार रोपे, जाळगेवाडी येथे २५ हेक्टरवर २७,५००, डेरवण, वेखंडवाडी, खराडवाडी येथे प्रत्येक २५ हेक्टर जमिनीवर प्रत्येकी २७,५०० रोपांची लागण करण्यात आली आहे. आवळा, बेहडा, हिरडा, दालचिनी, जांभूळ, शिकेकाई, लिंब, हेळा, चिंच, वड, पिंपरण, उंबर, साग, शिवण, ऐन, कुंभा, कांचनचा समावेश आहे. (प्रतिनिधी)


नरक्या (अमृता) वनस्पतींची लागवड
वनविभागाच्या रासाटी (कोयनानगर) येथे नरक्या या अत्यंत महत्त्वाच्या औषधी वनस्पतींची रोपवाटिका करण्यात आली आहे. त्यापैकी २५०० हजार रोपांची लागवड पाचगणी येथील वनक्षेत्रात करण्यात आली आहे. कॅन्सरवर उपयुक्त म्हणून नरक्या (अमृता) वनस्पतींच्या भुकटी (पावडरचा) वापर करण्यात येतो.

वनविभागाने लागवड केलेल्या वनस्पतींची वाढ करण्यासाठी वनरक्षक, वनमजूर, वनपाल आदी कर्मचारी व अधिकारी यापुढे सतर्क राहणार आहेत. तसेच उन्हाळ्यात वणव्यांपासून जंगले वाचविण्यासाठी गावोगावी शालेय विद्यार्थ्यांमार्फत वणवा विरोधी अभियान राबविण्यात येणार आहे.
- व्ही. आर. काळे, वनक्षेत्रपाल, पाटण

Web Title: Twenty-five hundred herbal medicinal plants

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.