कोयनेत भूकंपाचे दोन धक्के
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:39 AM2021-04-21T04:39:40+5:302021-04-21T04:39:40+5:30
कोयनानगर : कोयना परिसर मंगळवार, दि. २० रोजी भूकंपाच्या दोन धक्क्यांनी हादरला. भूकंपाचा पहिला धक्का दुपारी ३.२१ मिनिटानी, तर ...
कोयनानगर : कोयना परिसर मंगळवार, दि. २० रोजी भूकंपाच्या दोन धक्क्यांनी हादरला. भूकंपाचा पहिला धक्का दुपारी ३.२१ मिनिटानी, तर दुसरा धक्का ३.३३ मिनिटांनी जाणवला. बारा मिनिटांच्या अंतराने सलग दोन धक्के जाणवल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
कोयना येथील भूकंपमापन केंद्र्रावर या दोन भूकंपाच्या धक्क्याची नोंद झाली असून, पहिल्या भूकंपाची तीव्रता ३ रिश्टर स्केल असून, भूकंपाच्या केंद्रबिंदूरची खोली १६ किलोमीटर इतकी होती. त्यानंतर बारा मिनिटांनी झालेल्या दुसऱ्या भूकंपाची तीव्रता २.८ रिश्टर स्केल इतकी होती. याची खोली १५ किलोमीटर होती.
दोन्ही भूकंपांचा केंद्रबिंदू कोयना धरणापासून २० किलोमीटर अंतरावर वारणा खोऱ्यातील चिखली गावाच्या पूर्वेस ७ किलोमीटर होता. या भूकंपाच्या धक्क्याने जमीन व घर थरथरल्याने ग्रामस्थ भीतीने घराबाहेर पडले. भूकंपाचे दोन धक्के जाणवले असले, तरी कोयना धरण सुरक्षित आहे. भूकंपाने कोणतीही वित्तहानी झाली नाही, अशी माहिती कोयना सिंचन विभागाने दिली.