ज्येष्ठ नागरिक, महिलांवर हल्ले करून दरोडा टाकणाऱ्या दोघांना अटक; तब्बल २६ गुन्ह्यांचा लागला छडा

By दत्ता यादव | Published: July 13, 2024 09:24 PM2024-07-13T21:24:24+5:302024-07-13T21:24:45+5:30

शेख सुरेश भोसले (वय २७, रा. खामगाव ता. फलटण) याला अटक करण्यात आली असून, एका अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले.

Two arrested for assaulting and robbing senior citizens; As many as 26 crimes were committed | ज्येष्ठ नागरिक, महिलांवर हल्ले करून दरोडा टाकणाऱ्या दोघांना अटक; तब्बल २६ गुन्ह्यांचा लागला छडा

ज्येष्ठ नागरिक, महिलांवर हल्ले करून दरोडा टाकणाऱ्या दोघांना अटक; तब्बल २६ गुन्ह्यांचा लागला छडा

सातारा : जेष्ठ नागरिक व महिलांवर हल्ले करून दरोडा व जबरी चोरी करणाऱ्या टोळीतील दोघांना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली असून, त्यांच्याकडून तब्बल २६ गुन्ह्यांचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले. तसेच सुमारे ३९ लाखांचे ५४ तोळे सोन्याचे दागिनेही त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आले. दरम्यान, सराफ व्यावसायिकांना सोने विकणारा तसेच आणखी काही जण अद्याप फरार असल्याचे पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी सांगितले.

शेख सुरेश भोसले (वय २७, रा. खामगाव ता. फलटण) याला अटक करण्यात आली असून, एका अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले. सातारा जिल्ह्यातील फलटण आणि सातारा तालुक्यात २०२३ पासून दरोडा, जबरी चोरी, घरफोडी असे गुन्हे वारंवार घडत होते. ऑक्टोबर २३ मध्ये मालगाव, ता. सातारा येथे शेतात राहत असणाऱ्या एका वयोवृद्ध दाम्पत्याला बेदम मारहाण करून त्यांच्याकडून दागिने चोरून नेले होते. तसेच लोणंद पोलिस ठाण्याच्या हद्दीत जून २०२४ मध्ये दोन महिलांना जबर मारहाण करून जबरी चोरीची घटना घडली होती.

या दोन्ही घटनेंचा स्थानिक गुन्हे शाखेची टीम तपास करत होती. शेख भोसले हा या दोन्ही गुन्ह्यांत आरोपी असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अरुण देवकर यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी सहायक पोलिस निरीक्षक सुधीर पाटील व त्यांच्या पथकाच्या मदतीने फलटण भागात सापळा लावण्यात आला. संशयित शेख भोसले हा फलटण येथे येताच त्याला पोलिसांच्या पथकाने अटक केली. त्याच्यासोबत असलेल्या एका अल्पवयीन संशयित आरोपीलाही पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडे पोलिसांनी कसून चौकशी केली असता या दोघांनी ज्येष्ठ नागरिक व महिलांवर हल्ले केले असल्याचे कबूल केले. त्यांच्याकडून १ दरोडा, २३ जबरी चोरी, १ घरफोडी, १ चोरी असे एकूण २६ गुन्हे उघडकीस आले. यानंतर सराफांना विकलेला चोरीचा मुद्देमालही हस्तगत करण्यात आला.

 पोलिस अधीक्षक समीर शेख, अपर पोलिस अधीक्षक आंचल दलाल, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अरुण देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, सुधीर पाटील, रोहित फार्णे, पोलिस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, अमित पाटील, अतिश घाडगे, संतोष सपकाळ, विजय कांबळे, संजय शिर्के, साबीर मुल्ला, मुनीर मुल्ला, धीरज महाडिक, मंगेश महाडिक, अमित सपकाळ, प्रमोद सावंत, मोहसीन मोमीन, वैभव सावंत, पंकज बेसक आदींनी या कारवाईत भाग घेतला.

रेकाॅर्डब्रेक सोने हस्तगत...
नोव्हेंबर २०२२ पासून स्थानिक गुन्हे शाखेने ३११ गुन्हे उघडकीस आणले असून एकूण ७ किलो २०५ ग्रॅम सोने हस्तगत केले आहे. त्याची किंमत तब्बल ५ कोटी ४ लाख ९६ हजार ५०० इतकी आहे. रेकाॅर्डब्रेक सोने हस्तगत करण्यात स्थानिक गुन्हे शाखेचा हातखंडा आहे.      

 

Web Title: Two arrested for assaulting and robbing senior citizens; As many as 26 crimes were committed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.