गौण खनिजाची चोरी करणाऱ्या दोघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:35 AM2021-01-21T04:35:58+5:302021-01-21T04:35:58+5:30
सातारा : जावळी तालुक्यातील केंजळ येथून गौण खनिज चोरी करून त्याची वाहतूक करणाऱ्या दोघांना मेढा पोलिसांनी अटक केली. ...
सातारा : जावळी तालुक्यातील केंजळ येथून गौण खनिज चोरी करून त्याची वाहतूक करणाऱ्या दोघांना मेढा पोलिसांनी अटक केली.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, जहीर अजमुद्दीन शेख (वय ३०, रा. नेले, ता. सातारा) आणि प्रकाश विठ्ठल बोबडे (४०, रा. हामदाबाद, ता. सातारा) या दोघांनी केंजळ येथील कोणताही परवाना नसताना आठ ब्रास दगडांची चोरी केली. हे दगड चोरुन ते दोन डंपरमधून (एमएच ११ - सीएच ३३७३ आणि एमएच ११ - सीएच ३३६२) या दगडांची वाहतूक करत होते. याची माहिती मिळाल्यानंतर तलाठी ज्योती प्रवीण ढेरे (वय ३२, रा. वसुंधरा गार्डन, सातारा) यांनी तेथे छापा टाकला. यावेळी जहीर शेख आणि प्रकाश बोबडे दगडांची चोरून वाहतूक करत असल्याचे निदर्शनास आले. याची तक्रार ढेरे यांनी मेढा पोलीस ठाण्यात दिल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत या दोघांना अटक केली आणि त्यांच्याकडून आठ ब्रास दगड, दोन डंपर असा चार लाख रुपयांचा ऐवज जप्त केला. अधिक तपास पोलीस हवालदार उदय शिंदे करत आहेत.