कवठेजवळ दोन दुचाकींना कारने उडवले, जखमींना घेऊन चालक गायब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2017 07:13 PM2017-08-15T19:13:48+5:302017-08-15T19:14:00+5:30
भरधाव आलेल्या चारचाकीने दोन दुचाकींना ठोकरले. यामध्ये दोघे जखमी झाले असून, त्यातील महिला गंभीर जखमी आहे. अपघातानंतर चारचाकी चालकाने जखमी महिलेस वाहनात टाकून साताऱ्याच्या दिशेने पलायन केले.
सातारा, दि. 15 - भरधाव आलेल्या चारचाकीने दोन दुचाकींना ठोकरले. यामध्ये दोघे जखमी झाले असून, त्यातील महिला गंभीर जखमी आहे. अपघातानंतर चारचाकी चालकाने जखमी महिलेस वाहनात टाकून साताऱ्याच्या दिशेने पलायन केले. हा अपघात पुणे बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कवठे येथे मंगळवारी सायंकाळी चारच्या सुमारास घडला.
यांबाबत माहिती अशी की, पुण्याहून साताऱ्याला दुचाकी (एम एच ५० ई ५७८७) ही निघाली होती. या दुचाकीला पाठीमागून आलेल्या चारचाकीने जोरदार धडक दिली. यामध्ये दुचाकी सुमारे ७० फूट फरफटत गेली. दुचाकीवर पाठीमागे बसलेली महिला खाली पडल्याने गंभीर जखमी झाली. त्याचवेळी सुरुर येथील अमित बाळकृष्ण चव्हाण हे दुसऱ्या दुचाकी (एम एच ११ बीव्ही ९६०४) वरून भुईंजला निघाले होते. त्यांच्याही गाडीला धडक दिली. यात चव्हाण हे रस्ता दुभाजकत जाऊन पडले. त्यांना किरकोळ दुखापत झाली. अपघातानंतर चारचाकी चालकाने जखमी महिलेला स्वतःच्या वाहनातून साताऱ्याच्या दिसला नेले. कोणत्या रुग्णालयात दाखल केले याचा ग्रामस्त शोध घेत आहेत.