Satara- पुसेसावळीतील दंगल: दोन गुन्हे दाखल; २३ जण ताब्यात

By दीपक शिंदे | Published: September 11, 2023 07:28 PM2023-09-11T19:28:28+5:302023-09-11T19:29:00+5:30

नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे विशेष पोलिस महानिरीक्षकांचे आवाहन

Two cases filed in Pusesawali riots in Satara district; 23 people detained | Satara- पुसेसावळीतील दंगल: दोन गुन्हे दाखल; २३ जण ताब्यात

Satara- पुसेसावळीतील दंगल: दोन गुन्हे दाखल; २३ जण ताब्यात

googlenewsNext

सातारा : पुसेसावळी, ता. खटाव येथील घटनेच्या अनुषंगाने औंध पोलिस ठाणे येथे दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गुन्ह्याच्या तपासादरम्यान आतापर्यंत सुमारे २३ आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत असल्याचे कोल्हापूर परिसराचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी सांगितले.

औंध पोलिस ठाण्याच्या हद्दीत रविवार, दि. १० सप्टेंबर रोजी सोशल मीडियावर एका समूहाच्या दोन मुलांच्या अकाऊंटवरून आक्षेपार्ह कमेंट करण्यात आल्याचे निदर्शनास आले होते. त्या अनुषंगाने संबंधित दोन्ही मुलांना चौकशी कमी बोलवून विचारपूस करण्यात येत असताना यादरम्यान, आक्षेपार्ह कमेंटला दुसऱ्या समूहाच्या युवकांकडून आक्रमक प्रतिक्रिया देण्यात आली. 

रविवारी रात्री ९.३० च्या सुमारास दुसऱ्या समूहाच्या विचारसरणीच्या सुमारे शंभर ते दीडशे युवकांनी एकत्र जमून अचानकपणे दुचाकी व चारचाकी वाहने पेटवून दिली. पहिल्या समूहातील युवकांना मारहाण करून सार्वजनिक मालमत्तेची तोडफोड करत असताना पोलिसांनी योग्य त्या बळाचा वापर करून जमावास पांगवण्यात यश मिळविले. या मारहाणीमध्ये एकूण दहा व्यक्ती जखमी असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्या सर्वांची प्रकृती चांगली आहे. तसेच या घटनेमध्ये एक व्यक्ती उपचारदरम्यान मृत झाली आहे.

पुसेसावळी, ता. खटाव येथील घटनेच्या अनुषंगाने औंध पोलिस ठाणे येथे दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले असून, आक्षेपार्ह मजकुराच्या गुन्ह्याचा तपास औंधध पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक वाळवेकर हे करीत आहेत तर या घटनेतील खुनाच्या गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सातारा हे करीत आहेत.

सामाजिक सलोखा व शांतता राखावी..

पुसेसावळी घटनेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. सोशल मीडियावर कोणतीही चुकीची पोस्ट न करता सामाजिक सलोखा व शांतता राखावी आणि पोलिस व प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी केले.

Web Title: Two cases filed in Pusesawali riots in Satara district; 23 people detained

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.