कोयना परिसरात भूकंपाचे सलग दोन धक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:40 AM2021-05-09T04:40:25+5:302021-05-09T04:40:25+5:30

कोयनानगर : कोयना धरण परिसरात शनिवारी दुपारी भूकंपाचे सलग दोन सौम्य धक्के जाणवले. त्यांची तीव्रता कमी असल्याने जीवित व ...

Two consecutive tremors in the Koyna area | कोयना परिसरात भूकंपाचे सलग दोन धक्के

कोयना परिसरात भूकंपाचे सलग दोन धक्के

Next

कोयनानगर : कोयना धरण परिसरात शनिवारी दुपारी भूकंपाचे सलग दोन सौम्य धक्के जाणवले. त्यांची तीव्रता कमी असल्याने जीवित व वित्तहानी झाली नाही; मात्र यामुळे स्थानिक रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

कोयना धरण परिसरात शनिवारी दुपारी १ वाजून ५५ मिनिटांनी तसेच १ वाजून ५७ मिनिटाला दुसरा धक्का जाणवला. दोन मिनिटांच्या अंतराने दोन धक्के जाणवल्याने ग्रामस्थांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते.

कोयना येथील भूकंपमापन केंद्रावर पहिल्या भूकंपाची तीव्रता २.९ रिश्टर स्केल नोंदविली गेली असून भूकंपाच्या केंद्रबिंदूची खोली सात किलोमीटर खोल इतकी होती. त्यानंतर दोन मिनिटांनी झालेल्या दुसऱ्या भूकंपाची तीव्रता ३ रिश्टर स्केल इतकी नोंदविली गेली. याची खोली सात किलोमीटर होती. दोन्ही भूकंपाचा केंद्रबिंदू कोयना धरणापासून १३.६ किलोमीटर अंतरावर वारणा खोऱ्यातील जावळे गावाच्या वायव्य दिशेस आठ किलोमीटरवर होता. भूकंपाचे सलग दोन धक्के पाटण कोयना परिसरात जाणवले. जमिनी व घर थरथरल्याने लोक भीतीने घराबाहेर पडले. गेल्या महिन्यात २० तारखेलाही सलग भूकंपाचे दोन धक्के जाणवले होते.

या धक्क्याने कोयना धरण सुरक्षित असून कोणतीही वित्तहानी झाली नाही अशी माहिती कोयना सिंचन विभागाने दिली आहे.

Web Title: Two consecutive tremors in the Koyna area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.