कऱ्हाडला भाजी मार्केटसाठी दोन कोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:41 AM2021-05-08T04:41:21+5:302021-05-08T04:41:21+5:30
पालिकेतील जनशक्ती आघाडीने सादर केलेल्या अर्थसंकल्पाच्या उपसूचनेत याच मजल्यासाठी दीड कोटीची तरतूद करण्याची मागणी केली होती. जनशक्तीचे गटनेते राजेंद्र ...
पालिकेतील जनशक्ती आघाडीने सादर केलेल्या अर्थसंकल्पाच्या उपसूचनेत याच मजल्यासाठी दीड कोटीची तरतूद करण्याची मागणी केली होती. जनशक्तीचे गटनेते राजेंद्र यादव, महिला व बालकल्याण सभापती स्मिता हुलवान यांनी त्यासाठी विशेष प्रयत्न केले होते. त्यानुसार पालिकांच्या वैशिष्ट्यपूर्ण कामासाठीच्या विशेष अनुदानातून शासनाने दोन कोटीचा निधी मंजूर केला आहे.
छत्रपती संभाजी महाराज भाजी मार्केट १९८९ मध्ये बांधण्यात आले आहे. भाजी मंडईची वाढ व्हावी. भविष्यात मार्केट यार्ड परिसरातील विस्तारणाऱ्या लोकसंख्येचा विचार करून तत्कालीन नगराध्यक्ष ज्येष्ठ नेते पी. डी. पाटील यांनी नव्या भाजी मार्केटची उभारणी केली. त्याचा विस्तार जनशक्तीच्या काळात होत आहे. मध्यंतरी अनेक वर्षे भाजी मार्केट पडून होते. तेथे घाऊक बाजारात गुरुवारचा बाजार भरवण्याचा प्रयोग झाला. तसेच कोरोना काळात येथे विभागीय भाजी मंडई भरवली गेली. त्यामुळे येथे मार्केट विस्तारले. मात्र, याच मार्केटचा दुसरा मजला होत नव्हता. त्यासाठी राजेंद्र यादव व स्मिता हुलवान यांनी प्रयत्न सुरू केले. त्यानुसार जनशक्तीने पालिकेच्या अर्थसंकल्पाची उपसूचना मांडली. त्यामध्ये छत्रपती संभाजी भाजी मार्केटच्या वरच्या मजल्यासाठी दीड कोटीच्या निधीची मागणी केली होती. त्यानुसार शासनाने पालिकांच्या वैशिष्ट्यपूर्ण कामासाठीच्या विशेष अनुदानातून दोन कोटीचा निधी मंजूर केला आहे. तो निधी लवकरच पालिकेस वर्ग होईल. त्यातून संभाजी भाजी मार्केटच्या वरच्या मजल्याचे बांधकाम होणार आहे.