दहावी, अकरावीच्या दोन मुलींवर पिटी शिक्षकाचा अत्याचार; फलटण तालुक्यातील धक्कादायक घटना

By दत्ता यादव | Published: February 11, 2024 10:44 PM2024-02-11T22:44:06+5:302024-02-11T22:45:27+5:30

फलटण तालुक्यातील एका शाळेत एक शिक्षक पिटी शिक्षक म्हणून काम करत आहे. त्या शिक्षकाने दहावीत शिकणाऱ्या १६ वर्षांच्या मुलीवर अत्याचार केला. त्याचबरोबर इयत्ता अकरावीमध्ये शिक्षण घेत असलेल्या १७ वर्षीय मुलीवरही त्याने अत्याचार केल्याचे समोर आले आहे. 

Two girls of class 10th and 11th were abused by a teacher; Shocking incident in Phaltan Taluk | दहावी, अकरावीच्या दोन मुलींवर पिटी शिक्षकाचा अत्याचार; फलटण तालुक्यातील धक्कादायक घटना

प्रतिकात्मक फोटो...

सातारा : दहावी आणि अकरावीमध्ये शिक्षण घेत असलेल्या दोन मुलींवर एका पिटी शिक्षकाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना फलटण तालुक्यात उघडकीस आली असून, याप्रकरणी फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात संबंधित पिटी शिक्षकावर पोक्सोचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पाेलिसांनी दिलेली माहिती अशी की, फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यामध्ये तक्रार अर्ज दाखल झाला होता. या तक्रार अर्जाची पोलिसांनी चाैकशी केल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली. फलटण तालुक्यातील एका शाळेत एक शिक्षक पिटी शिक्षक म्हणून काम करत आहे. त्या शिक्षकाने दहावीत शिकणाऱ्या १६ वर्षांच्या मुलीवर अत्याचार केला. त्याचबरोबर इयत्ता अकरावीमध्ये शिक्षण घेत असलेल्या १७ वर्षीय मुलीवरही त्याने अत्याचार केल्याचे समोर आले आहे. 

खेळाच्या स्पर्धा संपल्यानंतर स्वत:च्या कारमधून पीडित मुलीला घरी सोडण्याचा बहाणा करत त्याने वाटेतच मुलीवर अत्याचार केला. हा प्रकार डिसेंबर २०२३ या कालावधीत घडला आहे. शिक्षकी पेशाला काळिमा फासणाऱ्या या घटनेची माहिती फलटण तालुक्यात पसरताच तीव्र संतापाची लाट उसळली आहे. फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात या घटनेची फिर्याद महिला पोलिस काॅन्स्टेबल यांनी दिली आहे. रात्री उशिरापर्यंत संबंधित पिटी शिक्षकाला पोलिसांनी अटक केली नव्हती. सहायक पोलिस निरीक्षक विशाल वायकर हे अधिक तपास करीत आहेत.    

Web Title: Two girls of class 10th and 11th were abused by a teacher; Shocking incident in Phaltan Taluk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.