दोन बोकडांंनी वाचविला मुलांचा जीव

By admin | Published: June 12, 2015 11:38 PM2015-06-12T23:38:10+5:302015-06-13T00:13:12+5:30

सदर बझार येथील घटना : डबक्यात विद्युत पुरवठा; जनावरांच्या मृत्यूनंतर परिसरात सतर्कता

Two goose-cares children survived | दोन बोकडांंनी वाचविला मुलांचा जीव

दोन बोकडांंनी वाचविला मुलांचा जीव

Next

सातारा : सदर बझार येथील दर्गाह कालव्याजवळ पावसाचे पाणी साचून तयार झालेल्या डबक्यात करंट लागल्याने एका बोकडाचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, याच बोकडाच्या मागे काही मुले चालत घराकडे निघाली होती. बोकडाला शॉक लागल्याने सर्व मुले पुढे निघून न जाता जागीच थांबली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. नागरिकांनी घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर डबक्यात विद्युतपुरवठा करणारी एक वायर तुटून पडल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ याठिकाणचा विद्युतपुरवठा बंद केला.
सदर बझार येथे झोपडपट्टी पुनर्वसन योजनेचे काम एका कंपनीमार्फत सुरू आहे. या कामासाठी राज्याबाहेरील कामगार मोठे संख्येने सदर बझारमध्ये आले आहेत. या सर्व कामगारांची राहण्याची व्यवस्था येथील जवान हौसिंग सोसायटी जवळ करण्यात आली आहे. कामगारांच्या जवळपास ३० ते ४० घरांना ठेकेदाराने कंपनी कार्यालयापासून ४० मीटर दूर भूमिगत केबल टाकून विजेची सोय केली आहे. गेल्या वर्षापासून ही केबल रस्त्याकडेला टाकण्यात आली आहे. ऊन व पावसामुळे ही केबल खराब होऊन यातील तारा उघड्यावर पडल्या आहेत.
शहरात गुरुवारी झालेल्या पावसामुळे ही केबल जमिनीबाहेर आली. ज्या ठिकाणी ही केबल जमिनीबाहेर आली त्याठिकाणी पाण्याचे एक डबके तयार झाले. केबलमुळे या डबक्यात वीजपुरवठा सुरू होता. दरम्यान, सायंकाळीच्या सुमारास दोन बोकड अचानक या डबक्याकडे आल्या. यावेळी वीजपुरवठा सुरू असल्याने दोन्ही बोकडांना विजेचा धक्का बसल्याने एका बोकडाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरी बोकड सुमारे पन्नास फूट लांब अंतरावर उडून पडली. जखम झाल्याने काही वेळांनंतर दुुसऱ्याही बोकडाचा मृत्यू झाला.
या बोकडांपाठोपाठ १३ ते १४ वर्षांची मुले पावसाचा आनंद लुटत घराकडे निघाली होती. डबक्यातील मृत बोकडाची अवस्था पाहून सर्व मुले डबक्यापासून अवघ्या चार फूट अंतरावरच थांबली होती. त्यांना पुढील धोक्याबाबत कसलीच कल्पना नव्हती. दरम्यान, हा सर्व प्रकार पाहून येथील रहिवासी दत्तात्रय शिंदे, बाबासाहेब शेलार, सुजीत जाधव यांनी घटनास्थळी धाव घेतली. पाहणीनंतर बोकडाचा डबक्यात सुरू असलेल्या विद्युत पुरवठ्यामुळे शॉक लागून मृत्यू झाल्याचे समजताच त्यांनी तत्काळ विद्युतपुरवठा बंद
केला. (प्रतिनिधी)


सदर बझार येथे झालेल्या या घटनेनंतर नागरिकांनी महावितरण कंपनीला याची माहिती दिली. यानंतर कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. मात्र, हे काम खासगी असल्याने संबंधितांना सुरक्षेबाबत योग्य त्या सूचना केल्या जातील असे, आश्वासन देऊन कर्मचारी निघून गेले.
- दत्तात्रय शिंदे, नागरिक


चिकटपट्टीने केली मलमपट्टी...
संबंधित ठेकेदाराने जमिनीतून विद्युतपुरवठा करण्यासाठी वापरलेली केबल कमी प्रतीची आहे. या प्रकाराबाबत माहिती मिळाल्यानंतरही त्याने विद्युतपुरवठा करणाऱ्या केबलला फक्त चिकटपट्टी लावून पुन्हा वीजपुरवठा सुरू ठेवला आहे. यामुळे जीवितास धोका निर्माण झाला असून, याठिकाणचा विद्युतपुरवठा बंद करावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांमधून होत आहे.

Web Title: Two goose-cares children survived

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.