कास परिसरात जोरदार वाऱ्यासह दोन तास मुसळधार पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:50 AM2021-04-30T04:50:13+5:302021-04-30T04:50:13+5:30

पेट्री : सातारा शहराच्या पश्चिमेस यवतेश्वर, अनावळे, पेट्री तसेच कास पठार परिसरात गुरुवारी सायंकाळी दीड ते दोन ...

Two hours of torrential rain with strong winds in Kas area | कास परिसरात जोरदार वाऱ्यासह दोन तास मुसळधार पाऊस

कास परिसरात जोरदार वाऱ्यासह दोन तास मुसळधार पाऊस

googlenewsNext

पेट्री : सातारा शहराच्या पश्चिमेस यवतेश्वर, अनावळे, पेट्री तसेच कास पठार परिसरात गुरुवारी सायंकाळी दीड ते दोन तास वादळी वाऱ्यासह जोरदार स्वरूपात पाऊस पडला. दरम्यान, बहुतांशी ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गारांचा पाऊस देखील पडला. सलग तीन दिवस काही ठिकाणी गारांचा पाऊस पडला. गुरुवारी या परिसरात सायंकाळी चार वाजल्यापासून उन्हाळी मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात होऊन दीड ते दोन तास पावसाने दमदार हजेरी लावली.

गेल्या काही दिवसांपासून उष्णतेचा पारा वाढतच चाललेला असताना, गेल्या दोन दिवसांपासून पडलेल्या पावसाने तसेच गुरुवारच्या मुसळधार पावसाने वातावरणात चांगलाच गारवा निर्माण होण्यास मदत झाली आहे. बहुतांशी ठिकाणी रस्त्यावर तसेच शेतात पाणी साचल्याचे दिसून येत होते. लहान मुलांनी पावसात भिजण्याचा तसेच गारा वेचण्याचा आनंद घेतला.

Web Title: Two hours of torrential rain with strong winds in Kas area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.