सायकल मॅरेथॉनमध्ये दोनशे स्पर्धकांचा सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 04:31 AM2021-01-04T04:31:39+5:302021-01-04T04:31:39+5:30
येथील प्रीतिसंगम बागेपासून रविवारी सकाळी ६ वाजता स्पर्धेला प्रारंभ झाला. नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, मुख्याधिकारी रमाकांत डाके, नियोजन सभापती विजय ...
येथील प्रीतिसंगम बागेपासून रविवारी सकाळी ६ वाजता स्पर्धेला प्रारंभ झाला. नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, मुख्याधिकारी रमाकांत डाके, नियोजन सभापती विजय वाटेगावकर, लोकशाही आघाडीचे नेते सौरभ पाटील, हणमंत पवार, मोहसिन आंबेकरी, विद्या पावसकर, अख्तर आंबेकरी, आरोग्य अभियंता आर. डी. भालदार, मिलिंद शिंदे, एन्व्हायरो फ्रेंड नेचर क्लबचे प्रा. जालिंदर काशीद, हिरकमी संस्थेचे मुख्य प्रशिक्षक अतुल पाटील आदी उपस्थित होते.
शहरातून मुख्य रस्त्याने कोल्हापूर नाका, ढेबेवाडी फाटा ते कोळे अशी ही स्पर्धा घेण्यात आली. लहान गट व महिला गटासाठी दहा किलोमीटर तर मोठ्या गटासाठी तीस किलोमीटर अंतर निश्चित केले होते. स्पर्धेत प्रथम क्रमांकासाठी सात, व्दितीयसाठी पाच, तृतीयसाठी तीन हजार रुपये व मानचिन्ह असे बक्षीस होते. उत्तेजनार्थ प्रत्येक गटात दोन बक्षिसे देण्यात आली. प्रत्येकी एक हजार रुपयांची बक्षिसे देण्यात आली. स्पर्धेत सहभागी झालेल्या प्रत्येकाला टी शर्ट, मेडल व प्रमाणपत्र देण्यात आले.
मॅरेथॉन स्पर्धेसाठी शिवाजी क्रीडा मंडळ, शाहीर आत्माराम यादव स्मृती प्रतिष्ठान, लोकशाही आघाडी, उमेश शिंदे मित्र परिवार, अख्तरभाई आंबेकरी मित्र परिवार, एन्व्हायरो फ्रेंड नेचर क्लब, जिमखाना, ए. पी. स्पोर्टस् व राज मेडिकल यांनी सहकार्य केले.
राष्ट्रीय कोच अतुल पाटील व त्यांच्या टीमने स्पर्धेचे नियोजन केले. शहरासह तालुक्यातील स्पर्धकांनीही सहभाग घेतला होता. पहिल्या मॅरेथॉनला चांगला प्रतिसाद मिळाला.
- चौकट
स्पर्धेतील गटनिहाय विजेते (अनुक्रमे)
लहान गट : (१० किलोमीटर) : साईराज कदम, श्रीगणेश जमदाडे, शार्दुल निकम
मोठा गट : (३० किलोमीटर) : अश्विन मर्डेकर, जार्ज थॉमस, सिध्दार्थ पाटील
महिला गट : प्रज्ञा लाड, मधुरा रावत, सिमरन तलरेजा
फोटो : ०३केआरडी०६
कॅप्शन :
कऱ्हाडमध्ये रविवारी आयोजित करण्यात आलेल्या सायकल मॅरेथॉन स्पर्धेतील विजेत्यांना नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांच्याहस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.