साताऱ्यात झुंजणार दोनशे संघ!
By admin | Published: January 19, 2016 10:38 PM2016-01-19T22:38:23+5:302016-01-20T00:48:31+5:30
स्पर्धेचे पंधरावे वर्ष : विद्युत झोतात टेनिस चेंडू क्रिकेट सामने रंगणार
सातारा : येथील छत्रपती शाहू क्रीडा संकुलात १ फेबु्रवारीपासून सुमारे दोनशे संघ झुंजणार आहेत. विद्युत प्रकाशझोतात होणार असलेल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेतील रोमांचक लढती पाहण्यासाठी साताऱ्यातील क्रिकेटरसिकांना उत्सुकता लागली आहे.
ही स्पर्धा एक तपापासून सुरू असून, एक महिना चालणार आहेत. विद्युत प्रकाशझोतातील स्पर्धा हा सातारकरांबरोबरच पश्चिम महाराष्ट्रासाठी नवीन होता. त्यावेळी माजी नगराध्यक्ष निशांत पाटील, माजी नगरसेवक बाळासाहेब ढेकणे, ज्येष्ठ क्रीडा संयोजक सुरेश साधले यांच्या संकल्पनेतून २००१ मध्ये कल्पनाराजे भोसले यांच्या आशीर्वादाने व खासदार उदयनराजे भोसले यांच्या पाठबळामुळे या स्पर्धांना प्रत्यक्ष सुरुवात
झाली.
स्पर्धेत सातत्य राखण्यासाठी माजी नगरसेवक दिवंगत गोपाळराव औताडे, माजी उपनगराध्यक्ष दिवंगत संजय जोशी, ज्येष्ठ क्रीडा समीक्षक दिवंगत सुधीर माजगावकर तसेच महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे सचिव सुधाकर शानभाग, विद्यमान नगरसेवक बाळासाहेब बाबर, कन्हय्यालाल राजपुरोहित, किशोर शिंदे, इर्षाद बागवान, चकोर देशमुख, धनंजय जाधव, नगरसेवक भालचंद्र निकम, कोच मयूर कांबळे, प्रसाद दिवेकर, पप्पू नारकर, शिवाजी वेलणकर, किरण तोडकरी, धर्मेंद्र निकम, राहुल कवितके प्रयत्न करत आहेत.
स्पर्धेचे उद्घाटन १ फेबु्रवारीला शाहू स्टेडियममध्ये खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते होणार आहे. तर बक्षीस वितरण २४ फेबु्रवारीला होणार आहे.
अधिक माहितीसाठी बाळासाहेब ढेकणे, सुरेश साधले, इर्शाद बागवान, किशोर शिंदे, चकोर देशमुख, धनंजय जाधव, राहुल कवितके, धर्मेंद्र निकम यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे. (प्रतिनिधी)
श्री. छ. प्रतापसिंह ऊर्फ दादा महाराज चषक
स्पर्धेसाठी १ लाख १० हजार रुपयांची पारितोषिके दिली जाणार आहेत. यामध्ये अनुक्रमे ५५ हजार व चषक, ३३ हजार व चषक, उपान्त फेरीत पराभूत होणाऱ्या संघांना २२ हजारांचे विभागून प्रोत्साहनात्मक रोख पारितोषिके व चषक देण्यात येणार आहे. तसेच उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, अष्टपैलू खेळाडू, सामनावीर अशी वैयक्तिक पारितोषिक देण्यात येतील.