भुर्इंजजवळील अपघातात सांगली जिल्ह्यातील दोघे ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 12:40 PM2021-03-09T12:40:01+5:302021-03-09T12:42:01+5:30
accident Satara- पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर भुर्इंज जोशी विहीर येथे भरधाव कारची ट्रकला पाठीमागून धडक बसून झालेल्या भीषण अपघातात सांगली जिल्ह्यातील विटा येथील दोघांचा जागीच मृत्यू झाला तर चारजण जखमी झाले. यातील तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे पोलिसांनी सांगितले. हा अपघात मंगळवारी पहाटे साडेचारच्या सुमारास झाला.
सातारा : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर भुर्इंज जोशी विहीर येथे भरधाव कारची ट्रकला पाठीमागून धडक बसून झालेल्या भीषण अपघातात सांगली जिल्ह्यातील विटा येथील दोघांचा जागीच मृत्यू झाला तर चारजण जखमी झाले. यातील तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे पोलिसांनी सांगितले. हा अपघात मंगळवारी पहाटे साडेचारच्या सुमारास झाला.
सुभाष बाबुराव पाटील (वय ७१), प्रवीण माळी (वय १९, रा. विटा, जि. सांगली) असे ठार झालेल्या तर महेश महादेव नवाळे (वय ४२), प्रवण दीपक लोंढे (वय २१), शुभांगी महेश नवाळे (वय ३५), शबाना मोहम्मद पठाण (वय ४०, सर्व रा. विटा, जि. सांगली) अशी जखमींची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, विटा येथील सहाजण पुण्याहून सांगलीला कारने (एमएच १०, सी एक्स ९८०७) निघाले होते. भुर्इंजमधील जोशी विहीर उड्डाण पुलावर पुढे चाललेल्या ट्रकला कारने पाठीमागून जोरदर धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, दोघाजणांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर भुर्इंज महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले.