औंधजवळ टेम्पो अपघातात दोन ठार; बारा जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2020 12:54 PM2020-09-07T12:54:17+5:302020-09-07T12:56:21+5:30
पुसेगाव येथून आले काढणीसाठी औंधला निघालेला टेंम्पो औंध येथे आल्यानंतर खबालवाडी रस्त्याकडे जाणाऱ्या पुलाजवळ उलटला. यामध्ये टेम्पोतील दोनजण जागीच ठार तर बाराजण जखमी झाले.
औंध : पुसेगाव येथून आले काढणीसाठी औंधला निघालेला टेंम्पो औंध येथे आल्यानंतर खबालवाडी रस्त्याकडे जाणाऱ्या पुलाजवळ उलटला. यामध्ये टेम्पोतील दोनजण जागीच ठार तर बाराजण जखमी झाले.
अपघातात ठार झालेले कामगार हे मध्यप्रदेशातील असल्याची माहिती समोर आली आहे. मृतांमध्ये २५ वर्षाचा युवक व १३ वर्षीय मुलीचा समावेश आहे. हा अपघात सोमवारी सकाळी झाला.
याबाबत माहिती अशी की, सोमवारी दि. ७ रोजी पुसेगाव येथून आले काढणीसाठी निघालेला एक टेंम्पो (एम एच ११ एजी ६०६२) सकाळी साडे सातच्या सुमारास औंधनजीकच्या खबालवाडी रस्त्याकडे जाणाऱ्या पुलानजीकच्या वळणावर आला असता अचानक उलटला. यात टेम्पोमधील दोनजण ठार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
टेम्पोतील इतर बारा जखमी कामगारांवर औंध ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून साताऱ्याला हलविले. सहाय्यक पोलीस निरीक्षक उत्तम भापकर, पोलीस नाईक प्रशांत पाटील, पोळ आदींनी अपघातस्थळी भेट दिली.