दोन किलोचा कोबी केवळ दोन रुपयाला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:40 AM2021-02-11T04:40:15+5:302021-02-11T04:40:15+5:30

कोपर्डे हवेली : सध्या बाजारपेठेत भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणात होत असल्याने शेतकऱ्यांचा माल कवडीमोल भावाने विकला जात असून, शेतकऱ्यांना ...

Two kilos of cabbage for only two rupees! | दोन किलोचा कोबी केवळ दोन रुपयाला!

दोन किलोचा कोबी केवळ दोन रुपयाला!

Next

कोपर्डे हवेली : सध्या बाजारपेठेत भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणात होत असल्याने शेतकऱ्यांचा माल कवडीमोल भावाने विकला जात असून, शेतकऱ्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. पार्ले (ता. कऱ्हाड) येथील शेतकरी रविराज नलवडे यांनी एक एकर क्षेत्रावर कोबीचे उत्पादन घेतले असून, दर मिळत नसल्याने त्यांनी पिकाचे तोडे बंद केले आहेत.

पार्लेतील रविराज नलवडे यांनी ऊसात आंतरपीक म्हणून एक एकर क्षेत्रावर कोबीचे उत्पादन घेतले. सात हजार कोबीच्या रोपांची लागवड डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात केली. दर चांगला मिळेल, या आशेवर त्यांनी उत्पादन खर्च जास्त केला. परिणामी, कोबीचे गड्डे चांगले आले होते. दोन किलोपासून अडीच किलोपर्यंतचे गड्डे होते. किलोवर गड्ड्याची विक्री केली जाते; पण सध्या बाजारपेठेत इतर भाजीपाल्याची आवक वाढल्याने कोबीच्या गड्ड्यांची विक्री अल्प दरात होऊ लागली. दोन किलोचा गड्डा केवळ दोन रुपयाला विकला जात असल्याने वाहतूक खर्चही परवडत नाही. त्यामुळे नलवडे यांनी कोबीची काढणी बंद केली असून, शेतातच त्याची कापणी करायचे ठरवले आहे.

गतवर्षापासून कोणत्याही भाजीपाला पिकाला दर नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. उत्पादन खर्च निघत नसल्याने माळव्याची शेती तोट्यात जाऊ लागली आहे.

- कोट

एक एकर ऊसात आंतरपीक म्हणून कोबीचे उत्पादन घेतले. कऱ्हाड बाजारपेठेतील व्यापाऱ्याने दर मिळत नसल्याने कोबी आणू नका, असे सांगितले आहे. त्यामुळे आम्ही शेतातच कोबी कापून टाकण्याचा निर्णय घेतला असल्याचे रविराज नलवडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

- चौकट

कोबीला दर नसल्यामुळे पै-पाहुणे, मित्र यांना मोफत कोबी वाटला असून, राहिलेले गड्डे कापून त्याचठिकाणी टाकणार आहे. ऊसाला खत म्हणून त्याचा वापर करण्यात येणार आहे.

- रविराज नलवडे

शेतकरी, पार्ले

फोटो : १०केआरडी०२

कॅप्शन : पार्ले (ता. कऱ्हाड) येथील शेतकरी रविराज नलवडे यांनी कोबीचे उत्पादन घेतले असून, दर नसल्यामुळे त्यांनी गड्डे शेतातच काढून टाकून दिले आहेत.

Web Title: Two kilos of cabbage for only two rupees!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.